×
Homeक्राईम स्टोरीPune Pimpri Crime | महिलेवर लैंगिक अत्याचार करुन 66 लाखाची फसवणूक करणाऱ्या...

Pune Pimpri Crime | महिलेवर लैंगिक अत्याचार करुन 66 लाखाची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक, देहूरोड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | महिलेवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) करुन जमीन खरेदी प्रकरणात (Land Purchase) 66 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन दोघांना अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार 10 जुलै 2021 ते 6 जानेवारी 2022 या कालावधीत (Pune Pimpri Crime) घडला आहे.

प्रदिप फक्कड कोळी Pradeep Fakkad Koli (वय-30 रा. तळेगाव दाभाडे), अंकुश सोनवणे (Ankush Sonawane), देवा विलास सोनवणे Deva Vilas Sonawane (वय-32 रा. पवनानगर, मावळ) यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) आयपीसी 376, 406, 420, 120ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 33 वर्षाच्या पिडीत महिलेने गुरुवारी (दि.29) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी प्रदिप कोळी आणि देवा सोनवणे यांना अटक (Pune Pimpri Crime) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकुश सोनवणे व प्रदिप कोळी यांनी पीडित महिलेला पवनानगर येथील जमीन चांगली असून ती तुझी एफडी मोडून घे असे सांगितले.
तसेच प्रदिप कोळी याने आपल्यात जे झाले ते कोणाला सांगू नको,
नाही तर तुला व तुझ्या मुलीला मागे-पुढे कोणी नाही एकेदिवशी गायब करेन अशी धमकी (Threat) दिली.
पिडित महिलेने एफडी मोडून जमिनीमध्ये गुंतवणूक (Investment) केली.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात 7/12 उतारा आला त्यावेळी फिर्यादी यांना दाखवलेली जमीन आणि सातबारा उताऱ्यावरील जमीन वेगळी असल्याचे समजले.

फिर्यादी यांनी अंकुश सोनवणे यांना बाबत विचारले असता त्याने माहित नसल्याचे सांगून प्रदिप कोळी हे सर्व पाहत असल्याचे सांगितले.
यानंतर प्रदीप कोळी याने महिलेच्या घरी येऊन लग्नाची मागणी घालून फिर्यादी यांना राहते घर नावावर करुन देण्यासाठी धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापीत केले.
आरोपींनी जमिनीच्या व्यवहाराचा बहाणा करुन महिलेकडून वेळोवळी 66 लाख रुपये घेऊन जमीन न देता त्यांची फसवणूक केली.
शारिरीक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक झाल्यामुळे महिलेला मानसिक धक्का बसला होता.
यातून सावरल्यानंतर त्यांनी गुरुवारी फिर्याद दिली.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गावडे (API Gawde) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Two arrested for sexually assaulting a woman and defrauding her of 66 lakhs, incident in Dehur Road area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Police Suspended | शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार निलंबित

Ajit Pawar | छगन भुजबळांचे ’ते’ मत वैयक्तिक, पक्षाची भूमिका नाही; अजित पवारांनी केला खुलासा

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News