Pune Pimpri Crime | उल्टा चोर कोतवाल को डांटे, ई-चलन कारवाई केल्याच्या रागातून रिक्षा चालकाने वरिष्ठ पोलिसांना दिली गुन्हा दाखल करण्याची धमकी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | रिक्षावर ई-चलन (E-Challan) कारवाई केल्याच्या रागातून रिक्षा चालकाने (Rickshaw Driver) वाहतुक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना (Senior Police Officer) पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्याची धमकी (Threat) दिल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये (Pune Pimpri Crime) घडला आहे. याप्रकरणी रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.21) रात्री साडेसातच्या सुमारास पिंपरीतील साई चौकात (Sai Chowk Pimpri) घडला.

आनंद सुरेश हिरेकर Anand Suresh Hirekar (वय-21) आणि त्याची पत्नी (दोघे रा. तपोवन मंदिर रोड, वाघेरे चाळ, पिंपरी) यांच्याविरुद्ध आयपीसी 353, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याबाबत पिंपरी वाहतुक शाखेचे (Pimpri Traffic Branch) पोलीस हवालदार वृषिकेश पांडुरंग पाटील
Police Constable Vrishikesh Pandurang Patil (वय-45) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात
(Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आनंद हिरेकर याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश हा साई चौकात त्याची रिक्षा (एमएच 14 एचएम 9765) उभी करुन
पत्नीसोबत थांबला होता. फिर्यादी यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या रिक्षाचे इ-चलन काढले.
याचा राग मनात धरुन आरोपीने व त्याच्या पत्नीने वाद घातला.
वरिष्ठ अधिकारी त्यांना समजावून सांगत असताना त्यांनाच उलट तुम्ही माझ्या पत्नीसोबत गैरवर्तन
(Abuse) करत असल्याचे म्हणत तुमचे पण नाव गुन्ह्यात देतो अशी धमकी दिली.
आरोपींनी फिर्यादी यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर दबाव आणून शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण
केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोळस (PSI Dolas) करीत आहेत.

Web Title :-  Pune Pimpri Crime | Ultah Chor Kotwal ko dante, angered by e-challan action, rickshaw puller threatens to file case against senior police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Solapur Crime | अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा ! झोपच्या गोळ्या, दोरी आणि चाकूचा वापर करून प्रियकराच्या मदतीने केला खून

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! तरुणीच्या प्रायव्हेट भागावर दारू ओतून खायला घातली मिरची पूड, केले ब्लेडने सपासप वार; भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे निगडी परिसरात खळबळ

Shrikant Eknath Shinde | खासदार श्रीकांत शिंदेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कारभार?, राष्ट्रवादीकडून ‘तो’ फोटो ट्विट करत केले गंभीर आरोप