Pune Pimpri Crime | कपाटातून कपडे काढताना पिस्तुल खाली पडून गोळी सुटली, महिला जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | कपाटातून कपडे काढताना पिस्तुल खाली पडले (Pistol Fell Down) अन् त्यामधून गोळी सुटली (Bullet Escaped). ही गोळी तरुणाच्या आईच्या पायाला लागल्याने त्या जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री 11 च्या सुमारास देहूगाव (Pune Pimpri Crime) येथील मिडास रेसिडेन्सी (Midas Residency Dehugaon) येथे घडली. लता मराठे (Lata Marathe) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यातील (Dehu Road Police Station) पोलीस किशोर दुतोंडे (Kishor Dutonde) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी लता यांचा मुलगा अक्षय शांताराम मराठे Akshay Shantaram Marathe (वय-26 रा. मिडास रेसिडेन्सी, कचरा डेपोसमोर, देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयकडे परवानाधारक पिस्तुल आहे. ते त्यांनी त्यांच्या कपड्यांच्या कपाटात ठेवले होते. त्यांना मंगळवारी बाहेरगावी जायचे असल्याने ते कपाटात टी-शर्ट शोधत होते. मात्र टी-शर्ट मिळत नसल्याने त्यांनी आईला आवाज दिला आणि टी-शर्ट शोधण्यास सांगितले.
अक्षय हा कपाटातून त्याचा ड्रेस ओढून काढत असताना कपड्यांवर ठेवलेली पिस्तूल खाली पडली. त्यातून एक गोळी सुटली आणि ती गोळी आईच्या पायाला लागली. यात लता जखमी झाल्या आहेत. अक्षय याने सुरक्षितता धोक्यात येईल, अशी कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title : Pune Pimpri Crime | while removing clothes from the cupboard the
pistol fell down and the bullet escaped woman injured
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त