Homeक्राईम स्टोरीPune Pimpri Crime | भोसरीत गळ्यावर वार करुन महिला व्यावसायिकेचा खून, आरोपी...

Pune Pimpri Crime | भोसरीत गळ्यावर वार करुन महिला व्यावसायिकेचा खून, आरोपी फरार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | भोसरीमध्ये एका व्यावसायिक महिलेच्या (Professional Woman) गळ्यावर वार करत खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना भोसरी येथे सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. पूजा देवी प्रसाद Pooja Devi Prasad (वय-32) असं खून झालेल्या व्यावसायिक महिलेचे नाव आहे. मयत पुजाचं ‘प्रगती कलेक्शन’ नावाचं दुकान आहे. तिथच आज सकाळी ही घटना घडली असून घटनेनंतर आरोपी (Pune Pimpri Crime) फरार झाला आहे.

 

या प्रकरणाची भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) नोंद करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनूसार, आज सकाळी पूजाने साडेनऊच्या सुमारास दुकान उघडलं. दुकानातील साफसफाई केली. काही वेळातच अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश करत पूजाच्या गळ्यावर चाकूने वार (Stab with a Knife) केले. त्यांच्यात झटापट झाली, पूजाने हल्ला केलेल्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्नही केला, दुकानाबाहेर काही अंतर पाठलाग केला. (Pune Pimpri Crime)

 

काही अंतरावर गेल्यावर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने पूजा रस्त्यावर कोसळल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषीत केले. महिलेच्या खूनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. मयत पूजाचं कुटुंब मागील 20 ते 25 वर्षे भोसरी परिसरात राहत आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

 

Web Title : – Pune Pimpri Crime | Woman businessman killed by stabbing her neck in Bhosari accused absconding

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News