पुणे/पिंपरी : पोलिसांमुळे टाळलं ‘गँगवर’, २३ जणांसह मोठा शस्त्रसाठा जप्त

पुणे/आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – भाईगीरी आणि स्वत:च्या परिसरात अस्तित्व टिवण्यासाठी गुंडगिरीचे वर्चस्व दाखवण्यासाठी गुरुवारी (दि.१) सायंकाळी दोन टोळ्यामध्ये होणारे टोळी युद्ध पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ व २ ने केलेल्या कारवाईत तब्बल २३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून कोयते, तलवारी, कुऱ्हाड, चॉपर, सत्तुर असे धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

मोशी गावातील गुन्हेगार सुरेश भोसले आणि चिंबळी गावातील भरत जैद यांच्यामधे पूर्वीपासून वाद आहेत. बुधवारी (दि.३१) सुरेश भोसले हा आपल्या साथीदरांसह भरत जैद आणि सतिश लोखंडे या दोघांना मारण्यासाठी गेला होता. मात्र, दोघेजण सापडले नसल्याने भोसले याने जैदच्या घराची तोडफोड केली. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन उद्या परत येतो असे सांगून निघून गेला. सुरेश भोसले हा गुरुवारी पुन्हा येणार असल्याने भरत जैद याने आपल्या साथीदारांसह चिंबळी येथेली एका कंपनीजवळ दबा धरून बसला होता.

सराईत गुन्हेगार भरत जैद हा स्वप्नील भोसले याला संपवण्यासाठी चिंवळी येथे साथीदारांसह दबा धरून बसल्याची माहिती पोलिस शिपाई गणेश सावंत यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट १ आणि २ च्या पथकानी चारीबाजूने घेराव घालून २३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त करण्यात आली. तसेच १२ दुचाकी आणि ६ चारचकी गाड्या जप्त करण्यात आला. पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ होता होता टळला.

भरत जैद हा २०१६ मध्ये झालेल्या प्रथमेश पगारे याच्या खुनातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यासह १३ जणांनी पगारे याचा खून करून मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला होता. या गुन्ह्याचा निकाल मार्च २०१९ मध्ये लागला असून तो सध्या बाहेर आला आहे. तर अटक करण्यात आलेल्या २३ आरोपी पैकी धिरज कुदळे व आशिष शहा या दोघांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तर सतीश लोखंडे याच्यावर दिघी पोलीस ठाण्यात बलात्कार व खूनाचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, चंद्रकांत अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रविंद्र राठोड, रविंद्र गावंडे, शिवाजी कानडे, बाळु कोकाटे, पोलीस नाईक अमित गायकवाड, मनोजकुमार कमले, महेंद्र तातळे, पोलीस शिपाई प्रविण पाटील, विशाल भोईर, सचिन मोरे, गणेश सावंत, तानाजी पानसरे, विजय मोरे, युनिट-२ चे चौधरी, पंधरे, कुकडे, मुंढे, कापसे, सानप, खोमणे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त