Pune : पिंपरीत रेमडीसिवीर इंन्जेक्शनची चढया दराने विक्री, महिलेसह तिघांविरूध्द FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या महामारीदरम्यान रेमडीसिवीर इंन्जेक्शनची चढया दराने विक्री होत असल्याचं पिंपरी-चिंचवडमध्ये आढळून आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरूध्द निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शाहीद जब्बार शेख (34), विजय बबन रांजणे (35) आणि वैष्णवी राजेंद्र टाकोरकर (30, तिघे रा. ओटा स्कीम, निगडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिखली परिसरात राहणार्‍या 19 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची आई परिसरातील एका नामांकित हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट आहे. त्यांना उपचारासाठी रेमडीसिवीर इंज्नेक्शन मिळत नव्हते. त्यावेळी एका नामांकित हॉस्पीटलमध्ये नोकरीस असणारा आरोपी शाहीद जब्बार शेख यांनी फसवणूक करून रेमडीसिवीर इंन्जेक्शन मिळवले. त्याच्या विक्रीचा कुठलाही परवाना नसताना चढया दराने विक्री केले. पोलिसांकडे फिर्याद प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.डी. आरदवाड अधिक तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like