पुणे : पिंपरी : 2 पोलीस कर्मचारी तडकाफडकी ‘निलंबित’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – रात्र गस्तीवर असलेल्या ‘बिट मार्शल’ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून काही रक्कम चोरुन नेली तर काही जळाली. या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत दोन पोलिस शिपाई यांना सेवेतून निलंबीत केले आहे.

सोमवारी (दि. 27) सकाळी दत्त मंदिर रोड वाकड येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये ही घटना घडली होती. अद्याप चोरट्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. चोरट्यानी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कापून चोरट्यांनी त्यातून रक्कम चोरुन नेली तर काही जळाली. या एटीएम।मध्ये आठ लाख रुपयांची रोकड होती. वाकड पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दत्तमंदिर रोडवर ही घटना घडल्याने पोलिसांच्या गस्ती विषयी संशय निर्माण झाला होता.

वाकड पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी डी. पी. कौलगे आणि बी. एच. टिंगरे हे रविवारी रात्री गस्तीवर होते. हद्दीत बिट मार्शल म्हणून काम करत असताना या दोन कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केला. त्यामुळे चोरट्यानी भर रस्त्यालगत असणारे आणि पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ असणाऱ्या एटीएम सेंटर फोडून लाखो रुपये लंपास केले. याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी तडकाफडकी दोन्ही कर्मचाऱ्यांना मंगळवारी रात्री सेवेतून निलंबीत केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा