Pune : एक झाड लावा आणि ऑक्सिजन मोफत मिळवा – सिनेअभिनेते शैलेश देशमुख

पुणे : पुणे तिथे काय उणे म्हणतात, ते अगदी खरे आहे. समाज चांगल्या अनुकरण करतो, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्याची गरज नाही. युवा जनरेशन नव्या संकल्पना राबवित आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. पुण्यातील एका तरुणाने एक झाड लावा आणि मोफत ऑक्सिजन मिळवा, असा संदेश चक्क एक नव्हे दोन नव्हे तब्बल दोनशे एक तुळस, आंबा आणि बदामांची 201 रोपे भर रस्त्यात थांबून देत अनोख उपक्रम राबविला. त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. डेक्कन चौक येथे आज डेक्कन चौकात गुरुवारी (दि. 6 मे 2021) राबविला. यावेळी प्लान्ट ट्री अँड गेट ऑक्सिजन फॉर फ्री (एक झाड लावा आणि ऑक्सिजन विनामूल्य मिळवा) असा संदेश सिनेअभिनेते शैलेश देशमुख यांनी दिला.

देशमुख म्हणाले की, मराठी चित्रपटामध्ये अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, आगामी सरसेनापती हंबीरराव या चित्रपटामध्ये नागोजी जेधे यांची भूमिका करत आहे. पाच मे रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. खूप छान उपक्रम असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. अनेक नागरिकांनी स्वतः वाहने थांबवून हक्काने रोप घेऊन जात होते, त्यामुळे मला वाढदिवस साजरा केल्याचे समाधान लाभले. ऑक्सिजनअभावी कोरोनाबाधित रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे, हे पाहून हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला आज पुणेकर नागरिकांकडून उत्तम सहकार्य लाभले. एक झाड तुम्हाला आयुष्यभर नाही, पुढील अनेक पिढ्यांना मोफत आणि स्वच्छ ऑक्सिजन देते, त्याची किंमत कधी कळली नाही. आता तरी सावध होऊन आपण झाडे तोडण्यापेक्षा त्याचे संवर्धन करू, नव्याने ऑक्सिजन देणारी देशी झाडे लावू, त्यापासून ऑक्सिजनबरोबर फळेही खाऊ असा संकल्प प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. कोरोना महामारीमुळे मागिल महिन्याभरापासून ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक जीव तडफडून गेले.

आजही ऑक्सिजनअभावी अनेकांची घालमेल होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढत आहे, त्यामुळे रुग्णालयामध्ये बेड मिळत नाही, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, रेमडिसिव्हर इंजेक्शन नाही, अशी भयावह अवस्था आहे. त्यामुळे मानवा आता तरी जागे हो झाडे लावा, झाडे जगवा आणि फुकट ऑक्सिजन मिळवा, असे वाहनचालकांना सांगत मोफत रोपे दिली. सकाळी 9 वाजता हा उपक्रम सुरू केला, त्याला पुणेकर नागरिकांसह वाहनचालकांनी त्याचे कौतुकही केले. ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाई रोप घेण्यासाठी आली आणि रोप घेतल्यानंतर त्याची लागवड करणार, संगोपन करणार आणि आजपासूनच कोणी वृक्ष तोडताना दिसला तर त्याला अटकाव करणार असे अनेकांनी सांगितले. त्यामुळे आजच्या कामाचे सार्थक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.