Pune Platform Ticket | पुणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी टाळण्याची उपाययोजना म्हणून रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway Station) प्लॅटफॉर्म तिकिटात (Pune Platform Ticket) वाढ केली आहे. दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा तिकीट दरात वाढ केली आहे. त्यामुळे सोमवार (दि. 24 ऑक्टोबर) पासून पुढील आठ दिवसांसाठी हंगामी प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ (Pune Platform Ticket) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन दरवाढीप्रमाणे पुढील आठ दिवसांसाठी (Pune Platform Ticket) पुणे रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म तिकीट दहा रुपयांऐवजी 30 रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे 24 ते 31 ऑक्टोबर हा निर्णय लागू राहील. दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकात दिवाळीच्या निमित्ताने उसळलेल्या गर्दीत एका प्रवाशाचा मृत्यू देखील झाला आहे.

पुणे स्थानकात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आणि मागील काही दिवसांत स्थानकातील प्रवाशी संख्या कमालीची वाढली आहे. प्रामुख्याने उत्तर भारतात (उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड) कडे जाणाऱ्या गाड्यांना फार गर्दी दिसून येत आहे. शनिवारी एक प्रवासी नातेवाईकांसोबत गाडी पकडण्यासाठी जात असताना, त्याला अचानक त्रास होऊ लागला. तो अगोदरपासून आजारी देखील होता. त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला मोकळ्या ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर तो तेथे बेशुद्ध पडला. प्लॅटफॉर्मवरील डॉक्टरांनी त्याला तपासले असता, तो मृत होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. बौधा मांझी (रा. बिहार) असे या व्यक्तीचे नाव आहे.

उत्तर भारतातून पुण्यात मोल-मजुरीसाठे आलेले मजूर दिवाळीनिमित्त आपल्या गावी जात आहेत.
त्यामुळे पुणे स्थानक गजबजले आहे. त्यातच दिवाळीसाठी मुंबई-पुणे गाड्यांची देखील लगबग आहे.
आपल्या नातेवाईकांना पोहोचविण्यासाठी अनेकजण प्लॅटफॉर्म तिकीट काढून गर्दी करतात.
त्यामुळे त्यांना चाप बसावा म्हणून ही भाडेवाढ करण्यात आली आहे.
तसेच नागरिकांनी स्थानक आणि प्लॅटफॉर्मवर विनाकारण गर्दी करु नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title :- Pune Platform Ticket | increase in platform ticket price at pune railway station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा