Pune PMC 24×7 Water Scheme | सूस, म्हाळुंगे या गावात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC 24×7 Water Scheme | पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) हद्दीत समाविष्ट झालेल्या सूस (Sus) आणि म्हाळुंगे (Mahalunge) या गावांमध्ये समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत (Pune Municipal Corporation’s 24×7 Water Project ) जलवाहिन्या टाकण्यात येणार असून त्यासाठी 62 कोटी रूपयांच्या निविदेला पुणे मनपाच्या स्थायी समितीने (PMC Standing Committee) मान्यता दिली आहे. (Pune PMC 24×7 Water Scheme)

पुणे मनपाच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या बाणेर-बालेवाडीसह सूस व म्हाळुंगे या परिसरातील नागरिकांना
प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागवावे लागत असल्याची परिस्थिती येथे आहे.

मनपाने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेनुसार पाणी पुरवठा सुरू ठेवला होता.
मात्र, नागरिकांच्या मागणीच्या तुलनेत पाणीपुरवठा कमी होत असल्याने परिसरातील पाण्याचा प्रश्न अधिकच
गंभीर बनला होता. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने देखील केली होती आणि या परिसराचा देखील
समावेश समान पाणीपुरवठा योजनेत करण्याची जोरदार मागणी केली होती.
मनपाने तात्पुरता उपाय म्हणून या परिसरात टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

Web Title :- Pune PMC 24×7 Water Scheme | Water pipes will be laid under the same water supply scheme in the villages of Soos and Mahalunge

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On ESZ | राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये व संरक्षित जंगलांच्या सीमेभोवतीच्या 1 किमीच्या पट्टयातील बांधकामबंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Maharashtra Political News | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 13, राष्ट्रवादीचे 20 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

MP Sanjay Raut | ‘स्वयंभू असतात त्यांच्या मागे जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना…’, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला