Pune PMC – 24×7 Water Supply Project | समान पाणी पुरवठा योजनेमुळे 84 एमएलडी पाणी गळती शोधण्यास यश – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC – 24×7 Water Supply Project | समान पाणी पुरवठा योजनेतर्ंगत सुरु असलेल्या विविध कामामुळे 84 एमएलडी इतकी पाण्याची गळती होत असल्याची माहीती पुढे आली आहे. ही गळती कमी करण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली जात असल्याची माहीती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC – 24×7 Water Supply Project)

 

महापालिकेत प्रशासक राज सुरु झाल्यास एक वर्ष पुर्ण झाले आहे. या पार्श्वभुमीवर आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना शहरातील महत्वाच्या समान पाणी पुरवठा योजना, पाण्याची वाढती गरज यावर माहीती दिली. समान पाणी पुरवठा योजनेचे काम पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत पुर्ण होईल. कोरोना कालावधीमुळे हे काम निर्धारीत मुदत पुर्ण होऊ शकले नाही. काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. योजना राबविण्यामागे गळती रोखणे हा महत्वाचा हेतू आहे. यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेतील प्रत्येक इनलेट आणि आऊटलेट पॉईंटवर मीटर बसविण्यात येत आहेत. यामुळे पाण्याची गळती शोधण्यास मदत होत असुन, 84 एमएलडी इतकी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ती कमी करण्यासाठी उपाय योजना केली जात आहे. (Pune PMC – 24×7 Water Supply Project)

 

व्हॉल्वसाठी स्वंयचलित यंत्रणा
शहरातील मोठ्या व्यासाच्या जलवाहीन्यांचे व्हॉल्व मधून पाणी सोडणे आणि पाणी बंद करण्याचे काम पुढील सहा महीन्यात स्वंयचलित यंत्रणेच्या माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी मनुष्यबळाची आवशक्यता कमी राहील. नियंत्रण कक्षातूनच हे काम केले जाणार आहे. याकरीता 306 व्हॉल्व बसविले जाणार आहे.

जुनी वाहीनीची दुरुस्ती आणि रंगरंगोटी
खडकवासला ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्र अशी सुमारे चाळीस वर्षाहून अधिक जुनी जलवाहीनी असुन,
या जलवाहीनीतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी सुमारे 50 कोटी रुपयांची निविदा काढली जाणार आहे.
या वाहीनीला चढलेला गंज काढणे, दुरुस्ती करणे आणि रंगरंगोटी करण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे जलवाहीनीचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार आहे. नव्याने जलवाहीनी टाकणे हे व्यवहार्य ठरणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पाण्याच्या मीटरची कमतरता
समान पाणी पुरवठा योजनेतर्ंगत पाण्याचे मीटर बसविण्यात येणार आहे.
मात्र, या पाण्याच्या मीटरसाठी आवश्यक चीप चा पुरवठा होत नाही.
त्यामुळे मीटर बसविण्याचे प्रमाण कमी असुन, लवकरच नवीन 90 हजार मीटर महापालिकेला प्राप्त होणार आहेत.

 

Web Title :- Pune PMC – 24×7 Water Supply Project | 84 MLD water leakages detected due to Samana Water Supply Scheme – Municipal Commissioner Vikram Kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune APMC Election 2023 – Haveli Market Committee | हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतांचा ‘भाव’ फुटला!

karishma Kapoor | ‘या’ कारणामुळे मी इतकी वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर होते; करिश्मा कपूरने केला मोठा खुलासा

Oscars Award 2023 | ऑस्करने मोडला रेकॉर्ड ! कोणत्याही वाद-विवादाशिवाय पार पडला यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा