Pune PMC Action | स्टॉल्सचे बेकायदेशीररित्या ‘गाळ्यांमध्ये’ रुपांतर ! बिबवेवाडी गावातील स्टॉलधारक अडचणीत; महापालिकेने बिबवेवाडी रस्त्यावरील तब्बल 67 गाळे केले सील

पोटभाडेकरू ठेवलेल्या स्टॉल धारकांचे परवाने होणार रद्द

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Action | बिबवेवाडी गावठाण (Bibvewadi Gaothan) येथील क्लाईन शाळेलगत पदपथावरील बांधीव गाळे आज महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) सील केले आहेत. विशेष असे की याठिकाणच्या गाळेधारकांकडे ‘स्टॉल’ चे परवाने असताना बेकायदा बांधकाम केल्याने आज महापालिकेने हे गाळे सील केले असून लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल अतिक्रमण विभागाचे (PMC Encroachment Department) प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी सांगितले.

महापालिकेच्यावतीने बिबवेवाडीतील विविध भागातील स्टॉल धारकांचे (PMC Stall Owner) क्लाईन शाळेलगतच्या पदपथावर पुनर्वसन केले आहे. याठिकाणी साधारण ५१ स्टॉल्स होते. मागील चार वर्षांपुर्वी येथील स्टॉल काढून सलग गाळे बांधण्यात आले आहेत. या गाळ्यांचे काम बेकायदेशीररित्या करण्यात आल्याबाबत महापालिकेकडे तक्रारी देखिल आल्या आहेत. तक्रारीनुसार चौकशीही करण्यात आली असून यामध्ये संबधितांवर गुन्हे दाखल (Pune Crime) करण्यात यावेत व गाळे पाडून टाकावेत असे चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळेच चार वर्षांपासून महापालिकेने येथील स्टॉलधारकांचे भाडे भरून घेतलेले नाही. अखेर आज महापालिकेने येथील सर्व गाळे सील केले आहेत. (Pune PMC Action)

यासोबतच ई.एस.आय. हॉस्पीटल (ESI Hospital, Pune) पंचदीप भवन येथील १६ गाळे देखिल सील करण्यात आले आहेत. भाडे थकविणे, भाड्याने स्टॉल देणे व अन्य अटींचे उल्लंघन करणे यामध्ये दोषी आढळल्याने हे स्टॉल सील करण्यात आले आहेत, असे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

पोटभाडेकरू ठेवलेल्या स्टॉल धारकांचे परवाने होणार रद्द

महापालिकेने परवाना दिलेले फेरीवाले आणि स्टॉलधारक यांची तपासणी सुरू केली आहे. महापालिकेने परवाना ज्यांच्या नावे दिला आहे, त्यांनीच तेथे व्यवसाय करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतू अनेक ठिकाणी पोटभाडेकरू ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने पोटभाडेकरु ठेवलेले स्टॉल आणि फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

Web Title : Pune PMC Action | Illegal conversion of stalls into shop ! Stall holders in Bibwewadi Gaothan in trouble; Pune Municipal Corporation has sealed 67 stalls on Bibwewadi road

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त