Pune PMC Anti Encroachment Drive | शिवाजीनगर परिसरातील हॉटेल्सवर कारवाईचा पुन्हा दणका, पुणे महापालिकेची 13 हॉटेल्सवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Anti Encroachment Drive | पुणे महानगरपालिकेने Pune Municipal Corporation (PMC) शिवाजीनगर परिसरातील हॉटेल्सवर (Hotels In Shivaji Nagar) पुन्हा कारवाई केली आहे. पालिकेने आपटे रस्ता, घोले रस्ता, देशमुख पथ येथे कारवाई करण्यात आली. या हॉटेल्सच्या फ्रंट मार्जिन, रेअर मार्जिन, साईड मार्जिन वर कारवाई करून 9000 चौ. फुट क्षेत्र मोकळं करण्यात आले. (Pune PMC Anti Encroachment Drive)

पुणे महापालिकेकडून 13 हॉटेल्स वर कारवाई करण्यात आली. या मध्ये होटल ग्रीन सिग्नल हॉटेल चा 5800 चौ. फुट चा समावेश आहे. या हॉटेलवर यापुर्वी दोनदा कारवाई करण्यात आली आहे. कारवाई मध्ये बांबू, पत्रा, लोखंडी अँगल, ओनिग च्या सहाय्याने बांधलेल्या शेड ईत्यादीचा समावेश आहे. पुणे महापालिकेने शिवाजी नगर परिसरातील ट्रिकाल, दुर्गा, जान्हवी, अनुष्का, केदार अमृततुल्य, माधवी स्वीट, बर्गर बाईटे या हॉटेलवर कारवाई केली. (Pune PMC Anti Encroachment Drive)

ही कारवाई कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनील कदम,
शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समिर गढई यांनी केली. या कारवाईत एक गॅस कटर, घरपाडी विभागाकडील 10 बिगारी, एक पोलीस गट सहभागी झाले होते. या नंतर पुन्हा विनापरवाना शेड उभारल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सुनिल कदम यांनी दिला आहे

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Khadse On Devendra Fadnavis | खडसेंनी फडणवीसांना करून दिली आठवण,
मराठा आरक्षण मिळाले नाही तर संन्यास घेईन म्हणाले होते

Pune Crime News | सायबर चोरट्यांकडून पाषाण, लोहगाव येथील दोघांची 26 लाखांची फसवणूक

Prajakta Mali Tattoo | प्राजक्ता माळीने हातावर कोरलंय ‘या’ स्पेशल व्यक्तीच नाव, ऐकून तुम्हालाही बसेल अश्चर्याचा धक्का.