Pune PMC Election 2022 | 29 जुलैला महिला आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत, इच्छुक पुन्हा गॅसवर 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Election 2022 | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्यातील ओबीसी समाजासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षण (OBC Reservation) देण्यास मंजुरी दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) निवडणुकीच्या कामाला गती दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या नुकतेच झालेल्या निर्णयानुसार राज्यातील 13 महापालिकांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आणि सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी 29 जुलै रोजी सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत. आरक्षण सोडत झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होउन पुणे, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad), मुंबई (Mumbai), नागपूरसह (Nagpur) 13 महापालिकांमधील निवडणुका (Pune PMC Election 2022)  सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

राज्यातील जवळपास सर्वच महापालिकांचा कार्यकाळ उलटून गेला असून त्याठिकाणी प्रशासकांची नियुक्ती (Administrator) करण्यात आली आहे. मुख्यत्वे ओबीसी आरक्षण आणि कोव्हिडमुळे निवडणुका लांबल्या होत्या. मात्र, दोनच दिवसांपुर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण देण्यास मान्यता दिली असून स्थगित केलेली निवडणूक प्रक्रिया (Electoral Process) तातडीने सुरू करण्याचे आदेशही राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. दरम्यान कालच सर्व महापालिकांतील अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना (Pune PMC Election 2022) 29 जुलै रोजी ओबीसी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठीच्या जागांसाठी नव्याने आरक्षण सोडत घेण्याचे आदेश दिले आहेत. या सोडतींनंतर 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचना मागवून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण तक्ता 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने 23 मे रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीसाठी एस.सी., एस.टी. समाजातील महिला व खुल्या जागा तसेच सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली होती. पुणे महापालिकेमध्ये 23 जागा एस.सी. साठी रिझर्व्ह असून त्यापैकी 12 जागा या एस.सी. प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर दोन जागा एस.टी. समाजासाठी राखीव आहेत. एस.सी. (SC) व एस.टी. (ST) समाजासाठीचे आरक्षण 2011 च्या जनगणनेनुसार ठेवण्यात आल्याने मतदार यादीमध्ये बदल झाले तरी यापुर्वी काढण्यात आलेल्या सोडतीनुसारच त्या जागा आरक्षित राहाणार आहेत. परंतू आता 27 टक्के ओबीसी आरक्षणामुळे पुणे महापालिकेमध्ये 47 जागा या ओबीसी प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. यामुळे ओबीसी प्रवर्गासोबतच महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढावी लागणार आहे.

 

ओबीसी आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये पुन्हा धाकधूक वाढली
महापालिकेच्या 173 जागांसाठी 23 मे रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. ओबीसी आरक्षणाशिवाय काढण्यात आलेल्या या सोडतीमुळे अनेक इच्छुकांना धुम फुटला होता. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे आता सर्वच इच्छुक पुन्हा गॅसवर आले आहेत. एस.सी. आणि एस.टी. प्रवर्गातील 25 जागांवरील सदस्य वगळता तब्बल 148 जागांवरील आरक्षणांमध्ये बदल होणार आहे.
यापूर्वीही खुल्या प्रवर्गातील अनेक इच्छुकांकडे ओबीसीचे दाखले (OBC Certificate) आहेत.
ती मंडळी खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठीच्या जागेवर निश्‍चितच दावा करू शकतात.
मात्र, ज्यांच्याकडे ओबीसीचे दाखले नाहीत अशा मंडळींची मात्र अडचण होणार आहे.

पुणे महापालिकेतील बलाबल

एकूण जागा – 173

महिलांसाठी राखीव – 87

एस.सी. प्रवर्गासाठी राखीव – 23 (12 महिला)

एस.टी. प्रवर्गासाठी राखीव – 2 (1 महिला)

ओबीसी प्रवर्ग – 47 (24 महिला)

सर्वसाधारण महिला – 50

सर्वसाधारण – 51

Leaving reservation for women and OBC category on 29th July

 

Web Title :- Pune PMC Election 2022 | Abandoning reservation for women and OBC categories on July 29, the aspirants are back on the gas

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Shreerang Barne | मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितला, शिवसेनेने…; खा. श्रीरंग बारणेंनी सांगितलं शिंदे गटात जाण्याचे कारण

 

Salman Khan | गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला, केली ‘ही’ मागणी

 

MLA Gulabrao Patil | ‘उद्धवसाहेबांना शाखेवर जावं लागतंय ही सगळ्यात वाईट परिस्थिती’ – गुलाबराव पाटील