Pune PMC Election 2022 | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय ?; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसच्या नेत्यांचा सूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Election 2022 | राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिका निवडणूकीचं बिगुल वाजलं आहे, दरम्यान, अद्याप राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक (Maharashtra State Election Commission) कार्यक्रम जाहीर केला नसला तरी या निवडणूका सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे (Pune PMC Election 2022). यामुळे राज्यातील सर्वच पक्ष आपली जोरदार तयारी करताना दिसत आहे. सध्या राज्यात शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) मिळून तिन्ही पक्षाचं सरकार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये (Maharashtra Local Body Elections) तिन्ही पक्ष एकत्र लढणार का ? यामध्ये संभ्रम आहे. दरम्यान, पुणे आगामी महापालिकेची निवडणूक (Pune PMC Election 2022) आम्हाला स्वबळावरच लढायची आहे. असा सूर आता आघाडीच्या नेत्यांमधून उमटू लागला आहे.

 

पुण्यात एक वेगळं वातावरण निर्माण होताना दिसत आहे. एकत्र लढणार का स्वबळावर ? यामध्ये अद्याप अधिकृत माहिती समोर नसली तरी वरिष्ठांनी आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्रित लढतील असं सांगितलं तर आम्ही निवडणूक एकत्रित लढू असाही सूर उमटताना दिसत आहे. महापालिकेची आगामी निवडणूक (Pune PMC Election 2022) आम्हाला स्वबळावरच लढायचीय. आमचे कार्यकर्ते प्रत्येक प्रभागात सक्षम असून, आमच्याकडेही तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केलीय. मात्र, पक्षाच्या वरिष्ठांनी भाजपला (BJP) रोखण्यासाठी पुण्यातही महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला तरच आम्ही आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुकीत उतरु असं पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना म्हणत आहे.

दरम्यान, महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांमुळे महापालिका निवडणुकीचे यंदाचे वातावरण वेगळे आहे.
उपनगरांमध्ये राष्ट्रवादीने (NCP) आम्ही सर्वाधिक प्रबळ असल्याचा दावा केलाय.
राष्ट्रवादीने पहिल्यापासूनच 58 प्रभागात सर्वाधिक जागांचा दावा केलाय.
यामुळे काही वर्षांपूर्वी महापालिकेत एकहाती राज्य करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांत उमेदवारीबाबत असुरक्षिततेची भावना दिसून येत आहे.
तसेच, शिवसेनेलाही आघाडीतील जागा वाटपामध्ये आपल्याला किती जागा मिळणार याचीही चर्चा होताना दिसत आहे.
राष्ट्रवादीने निवडणुकीमध्ये आम्हीच प्रबळ दावेदार असल्याचे म्हटल्यानं तिन्ही पक्ष पुणे शहरात ‘एकलाच चलो रे’ चा आग्रह धरताना दिसतोय.

 

दरम्यान, या तिन्ही पक्षांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे प्रत्येक प्रभागात इच्छुक निवडणूकीचे व्यवस्थापन करण्यास सज्ज झाला आहे.
विशेष म्हणजे या महापालिका निवडणूकीमध्ये कदाचित महाविकास आघाडी एकत्र लढली तर या तिन्ही पक्षात बंडखोरीचं वातावरण निर्माण होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.
या दरम्यान, निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र न लढल्यास याचा मोठा फायदा भाजपला (BJP) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास भाजपचा विजय निश्चित असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून बोललं जात आहे.
खंरतर दुसरीकडे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आघाडीत एकत्रीत लढू अशी भावना देखील तिन्ही पक्षामधून वर्तवली जात आहे.

 

 

Web Title :- Pune PMC Election 2022 | mahavikas aghadi leaders want to face pmc election 2022 on own waycongress shivsena ncp as well as bjp and mns also

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा