Pune PMC Election 2022 | महापालिका निवडणूक 2022 ! आरक्षण सोडतीमुळे साधारण 35 जुने चेहेरे मनपाच्या नवीन सभागृहात दिसणार नाहीत; सोडतीनंतर मध्यवर्ती पेठांत भाजप तर उपनगरांत राष्ट्रवादी कॉंग्रेसला फटका बसल्याचे स्पष्ट

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Election 2022 | महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (Pune Municipal Corporation Election) आज आरक्षण सोडत झाली. या आरक्षण सोडतीमध्ये विशेषत: अनुसुचित जातीसाठी (Scheduled Castes) महिला व खुल्या आरक्षणामध्ये उलटफेर झाल्याने या गटातील नगरसेवक (PMC Corporator) आणि नगरसेविका पुढील सभागृहात दिसणार नाहीत. फारतर त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य सभागृहात नवीन चेहेरा म्हणून येतील. तर प्रभागातील सदस्य संख्या चार वरून तीनवर आल्याने आणि त्यातही महिला आरक्षणामुळे काही प्रभागात विद्यमान सदस्यांची एकमेकांविरोधात आणि काहींची उमेदवारी मिळविण्यापासून पक्षांतर्गत स्पर्धा रंगणार असल्याचे आजच्या सोडतीवरून स्पष्ट झाले आहे. (Pune PMC Election 2022)

अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या सध्याची जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने अविनाश साळवे, अ‍ॅड. भय्यासाहेब जाधव, राहुल भंडारे, वीरसेन जगताप, प्रदीप गायकवाड या नगरसेवकांची संधी धूसर झाली आहे. तर नगरसेविकांच्या जागेवरही अनुसुचित जातीचे खुले आरक्षण पडल्याने माजी उपमहापौर सुनीता वाडेकर आणि पल्लवी जावळे यांच्या ऐवजी त्यांच्या कुटुंबातून अन्य कोणी उमेदवार येतील असे प्रथमदर्शनी दिसते. अनुसुचित जमातीच्या उमेदवारांसाठी दोनच जागा होत्या. यापैकी २०१७ मध्ये अनुसुचित जमातीसाठीच्या महिला जागेवर निवडूण आलेल्या राजश्री काळे यांच्या प्रभागातील आरक्षणच उठले आहे. तर प्रभाग क्र. १ मधून अनुसुचित जमातीच्या खुल्या जागेवर निवडूण आलेले मारूती सांगडे यांच्या प्रभागामध्ये अनुसुचित जमातीतील महिलेसाठी आरक्षण पडले आहे. त्यामुळे काळे आणि सांगडे यांना पक्षाने उमेदवारी देण्यावरच पुढील निर्णय होणार आहे. (Pune PMC Election 2022)

 

 

तीन सदस्यीय प्रभागामुळे मध्यवर्ती पेठांमध्ये भाजपची अडचण आरक्षणामुळे अधिकच वाढली

मध्यवर्ती भागातील प्रभागांची संख्या कमी झाली. यामुळे सदस्य संख्याही कमी झाली आहे. विशेषत: प्रभाग क्रमांक १७ ( शनिवार पेठ – नवी पेठ ) , प्रभाग क्रमांक १८ ( शनिवार वाडा – कसबा पेठ ), प्रभाग क्रमांक २८ ( महात्मा फुले स्मारक – भवानी पेठ ), प्रभाग क्रमांक २९ ( घोरपडे उद्यान – महात्मा फुले मंडई ) या प्रभागात भाजपचे आहे. प्र. १७ मधील एकच जागा सर्वसाधारण खुली असून दोन जागांवर खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षण आहे. याठिकाणाहून हेमंत रासने, धीरज घाटे या प्रमुख पदाधिकार्‍यांसोबत विद्यमान नगरसेवक राजेश येनपुरे हे देखिल इच्छुक आहेत. दिवंगत नगरसेवक महेश लडकत यांचे बंधू शैलेश लडकत, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष बापू मानकर, कसबा विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्यासह काही माजी नगरसेवक इच्छुक आहेत.

 

जागा एक आणि उमेदवार अनेक अशी परिस्थिती झाल्याने या प्रभागामध्ये भाजपची चांगलीच गोची झाली आहे. तसेच घोरपडे उद्यान- महात्मा फुले मंडई या प्रभागातही एकच जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी असल्याने भाजपचे नगरसेवक अजय खेडेकर आणि सम्राट थोरात यापैकी कोणाला संधी मिळणार ?  याची उत्सुकता वाढली आहे. प्रभाग क्रमांक २८ मध्ये महिलांसाठी एकच जागा असल्याने आणि येथे भाजपच्या नगरसेविकांची संख्या अधिक असुन, येथे आरती कोंढरे, सुलोचना कोंढरे, विजयालक्ष्मी हरीहर या विद्यमान नगरसेविकां यांच्यात उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. हीच परीस्थिती प्रभाग क्रमांक १६ ( फर्ग्युसन कॉलेज – एरंंडवणे ) या प्रभागात आहे, येथे महीलांसाठी एक जागा असुन येथे विद्यमान नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, निलीमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे या इच्छुक आहेत.

 

उपनगरांमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही अडचण वाढणार

प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडू गायकवाड आणि भाजपचे नगरसेविक उमेश गायकवाड हे काका – पुतणे एकमेकांसमोर उभे ठाकतील असे चित्र झाले आहे. प्रभाग क्रमांक ३६ ( कर्वेनगर ) येथे दोन जागा महीलांसाठी आरक्षित झाल्या आहेत, यामुळे भाजपचे सुशील मेंगडे आणि राजाभाऊ बराटे यांच्यापैकी उमेदवारी कोणाला मिळणार हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. हीच स्थितीन प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमाक ५२ ( नांदेड सिटी – सनसिटी ) या प्रभागात असुन, भाजपच्या प्रसन्न जगताप आणि श्रीकांत जगताप यांना उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. प्रभाग क्रमांक ५६ ( चैतन्य नगर – भारती विद्यापीठ ) येथे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक विशाल तांबे आणि युवराज बेलदरे यांची अडचण झाली आहे. वरिल ठिकाणी कुटुंबातील महिला अथवा पुरूषांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

 

येथे विद्यमान एकमेकांविरोधात लढण्याची शक्यता

प्रभाग क्र.१ धानोरीमध्ये एकच जागा खुली असून भाजपचे बॉबी टिंगरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रेखा टिंगरे या दोघांपैकी एकजण पुढील सभागृहात नसेल. कोरेगाव पार्क- मुंढवा या प्रभागामध्ये एकच जागा सर्वसाधारण महिलेसाठी असल्याने भाजपच्या मंगला मंत्री आणि लता धायरकर यांच्यामध्ये उमेदवारीसाठी चुरस होणार आहे.
प्रभाग २७ कासेवाडी- लोहियानगरमध्येही एकच जागा महिलांसाठी आरक्षित असून भाजपच्या अर्चना तुषार पाटील आणि मनीषा संदीप लडकत या दोघींपैकी एकच चेहेरा सभागृहात येण्याची शक्यता आहे.
प्र.क्र. ३७ जनता वसाहत-दत्तवाडी मध्ये एकच जागा महिलांसाठी राखीव असल्याने प्रिया गदादे आणि अनिता कदम यांची समोरा समोर लढत होण्याची शक्यता आहे.

 

प्र.क्र. ४१ कोंढवा खुर्द- मीठानगर मध्ये एकच जागा महिलांसाठी खुली असल्याने परवीन हाजी फिरोज व
हमीदा सुंडके यांच्या पैकी एका सदस्याला घरी बसावे लागणार असून त्यांच्या कुटुंबातून अन्य पुरूष
उमेदवार रिंगणात येण्याची शक्यता आहे. विशेष असे की सर्वसाधारण गटात हाजी गफूर पठाण आणि
साईनाथ बाबर हे दोघे समोरासमोर येण्याची शक्यता आहे. लगतच्या प्र. क्र. ४७ कोंढवा
बु.- येवलेवाडीमध्येही विद्यमान सदस्य संगीता ठोसर आणि वृषाली कामठे यांच्यामध्ये लढत होउ शकते.
तर प्र.क्र. ४९ बालाजीनगर- शंकर महाराज मठ प्रभागात विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे आणि
राजेंद्र शिळीमकर हे समोरासमोर येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी थेट लढत टाळण्यासाठी
कुटुंबातील महिला अथवा पुरूष सदस्यही ऐनवेळी मैदानात येण्याची शक्यता असल्याने आगामी
महापालिकेच्या सभागृहामध्ये किमान 35 नवीन चेेहेरे दिसतील असे किमान या आरक्षण सोडतीवरून दिसत आहे.

Web Title : Pune PMC Election 2022 | Pune Municipal Corporation Election 2022!
About 35 old faces will not be seen in the new hall of the corporation due to
reservation draw; After the draw, it is clear that BJP was hit in the
central suburbs and NCP in the suburbs

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त