Pune PMC Election 2022 | महापालिका निवडणूक ! 17 जूनला प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध होणार; 7 जुलैला अंतिम मतदार याद्या जाहिर करण्याचे निवडणूक आयोगाचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Election 2022 | महापालिका निवडणुकांच्या (Pune Municipal Corporation Election 2022) आरक्षण सोडतीनंतर (PMC Election Prabhag Ward Reservation Draw) प्रभाग निहाय मतदारयाद्या अंतिम (Voting List) करण्याचे आदेश आज राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार १७ जून रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करून २५ जूनपर्यंत त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार असून ७ जुलैला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. (Pune PMC Election 2022)

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

राज्यातील १४ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अनुसुचित जाती, जमाती व महिला आरक्षणाची सोडत झाली. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज सर्व महापालिकांना प्रभागनिहाय मतदार याद्या (Ward Wise Voter Lists) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune PMC Election 2022)

 

निवडणुकीसाठी ५ जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीच्या (Prabhag Wise Voter Lists) आधारे मतदार याद्या करण्यासात येणार आहेत. प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांनंतर १३ मे रोजी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. प्रभाग रचना अंतिम करताना प्रभागांमध्ये बदल झाले असून मतदार संख्येतही बदल झाले आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्याने आता मतदार याद्याही अंतिम करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

यानुसार १७ जून रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. १७ ते २५ जून दरम्यान या याद्यांवर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने लेखनिकांच्या काही चुका, दुसर्‍या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले असतील, संबधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही संबधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे यादीत समाविष्ट करणे याच दुरूस्त्या केल्या जाणार आहेत.
या दुरूस्त्यांनंतर अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या ७ जुलै रोजी प्रसिद्ध कराव्यात, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अंतिम मतदार याद्या महापालिकेचे मुख्य कार्यालय, प्रभाग समितीचे कार्यालयातील सूचना फलक,
स्थानीक वृत्तपत्र व केबल टीव्हीवर प्रसिद्धीची सूचना देउन तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे
आदेशही महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.

 

 

Web Title :- Pune PMC Election 2022 | Pune Municipal elections! The draft voter lists will be released on June 17; Election Commission orders release of final voter lists on July 7

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO Interest Rate | नोकरदारांना मोठा धक्का ! EPFO च्या व्याजदरात मोठी कपात

 

Ajit Pawar | ‘रात्री कोण कुठं फिरतंय, गार्डनमध्ये गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार’ – अजित पवार

 

High Court Order On Corona Mask Rules | ‘विमानात मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’ – उच्च न्यायालयाचे आदेश