Pune PMC Election 2022 | पुणे महापालिकेच्या आरक्षणात महिला राज, अनेक दिग्गजांची गणिते बिघडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे (Pune PMC Election 2022) महाराष्ट्राचं लक्ष आहे. महापालिकेच्या आगामी सर्वत्रिक निवडणुकांसाठी (Pune PMC Election 2022) आरक्षण (Reservation) सोडत जाहीर झाली आहे. पुण्यात एकूण 58 प्रभागात 173 जगांसाठी आज सोडत पार पडली. यामध्ये 173 जागांपैकी 87 जागेवर महिला आरक्षण जाहीर झाले आहे. सोडतीत अनेक नेत्यांच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने त्यांना नवीन प्रभागाचा (Ward) किंवा घरातील महिलांना रिंगणात उतरावे लागेल. तर काही प्रभागांमध्ये पक्षातील इच्छुकांबरोबरच उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागेल. तर अनेकांना नगरसेवक (Corporator) होण्याच्या इच्छेवर पाणी सोडावे लागणार आहे. अनेकांना पक्षांतराशिवाय पर्याय राहिलेला नाही.

 

 

पुणे महापालिकेच्या आगामी निवडुकीसाठी (Pune PMC Election 2022) 50 टक्के आरक्षणाची सोडत झाली. यामध्ये 29 प्रभागात दोन महिला आरक्षण पडल्याने या प्रभागातील विद्यमानांची चांगलीच अडचण झाली आहे. तर विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी जाण्याबाबत असलेली धाकधूक यामुळे कमी झाली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडतीबाबतची उत्सुकता संपल्यानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र 29 प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी (Candidacy) मिळवण्यासाठी झगडावे लागणार असल्याचे समोर आले आहे.

स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्षपद (Standing Committee Chairman) मिळवणाऱ्या हेमंत रासने (Hemant Rasane), माजी सभागृह नेते धीरज घाटे (Dheeraj Ghate) हे इच्छुक असलेले प्रभाग क्रमांक 17 मध्ये दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.या दोघांसह राजेश येनपुरे (Rajesh Yenpure), दिलीप काळखे (Dilip Kalkhe), कृणाल टिळक (Krinal Tilak), बापू मानकर (Bapu Mankar), प्रमोद कोंढरे (Pramod Kondhare) यांच्यामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तर प्रभाग 20 मध्ये दोन जागा महिलांसाठी झाल्याने याठिकाणी देखील चुरस पहायला मिळणार आहे. माजी महापौर रजनी त्रिभुवन (Former Mayor Rajni Tribhuvan), लता राजगुरु (Lata Rajguru) यांना उमेदवारी मिळवण्यासाठी झगडावे लागेल. तसेच प्रभाग 10 मध्ये दोन्ही जागा महिलांसाठी राखीव झाल्याने आजी-माजी नगरसेवकांना सभागृहात जाण्याच्या इच्छेवर पाणी सोडावे लागणार आहे.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

बाळासाहेब बोडके (Balasaheb Bodke), आदित्य माळवे (Aditya Malve), राजू पवार (Raju Pawar),
चंद्रकांत अमराळे (Chandrakant Amarale) यांच्यासह अनेकांना इतर प्रभागाचा आसरा घ्यावा लागणार आहे.
प्रभाग 16 महिलासाठी राखीव असलेल्या माधुरी सहस्त्रबुद्धे (Madhuri Sahastrabuddhe),
मंजुश्री खर्डेकर (Manjushree Khardekar), नीलिमा खाडे (Nilima Khade),
ज्योत्स्ना एकबोटे (Jyotsna Ekbote) या महिलांसह इच्छुकांची संख्या मोठी आहे.

 

Web Title :- Pune PMC Election 2022 | woman power in the reservation of Pune Municipal Corporation Election 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | आई-बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा खून, 3 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

 

आता विना कटकट काढा PF चे पैसे, मिनिटात थेट जनरेट होईल UAN; EPFO ने दिली ही नवी सुविधा

 

Ration Without Ration Card | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! आता रेशनकार्डशिवाय मिळणार रेशन? जाणून घ्या