Pune PMC Election -2023 | पुणे महानगरपालिकेसाठी 4 सदस्यीय 166 प्रभाग होणार काय?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Election -2023 | पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे-फडणवीस सरकारने 2011 नुसार प्रभाग रचना (PMC Ward) कायम ठेवली होती. मात्र, या विरोधात शिवसेनेने (Shivsena) हायकोर्टात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. ही याचिका सोमवारी फेटाळण्यात आली आहे. पुणे महानगर पालिका क्षेत्रात ज्या प्रमाणात प्रभाग वाढतील त्यानुसार आत्ताच्या शासन निर्णयानुसार चारचे प्रभाग (Pune PMC Election -2023)  करावे लागणार आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त 166 प्रभाग असू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) विरोधात मुंबई हायकोर्टात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. हा निकाल सोमवारी देण्यात आला. त्यानुसार 2011 ची लोकसंख्या हीच कायद्याने गृहीत धरावी लागणार आहे. नवीन प्रभाग रचना करताना शासनाच्या तत्कालीन आदेशानुसार मुबई महापालिकेने 227 च्या ऐवजी 236 प्रभाग केले. हे प्रभाग करताना 10 टक्के लोकसंख्या वाढीव धरण्यात आली होती. कायद्यानुसार अशी लोकसंख्या गृहीत धरली जात नाही. शेवटची जी जनगणना आहे त्याच आधारावर प्रभाग रचाना करणे आवश्यक असते, असे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर (Ujjwal Keskar) व सुहास कुलकर्णी (Suhas Kulkarni) यांनी सांगितले.

 

पुणे महानगरपालिकेने (Pune PMC Election -2023) दहा टक्के लोकसंख्या जास्त धरुन नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांसह तत्कालीन शासनाच्या आदेशानुसार तीनचे प्रभाग केले आहेत. मात्र हे कायद्याला धरुन नसल्याने पुणे महानगरपालिकेला ही प्रभाग रचना रद्द करावी लागणार आहे. याशिवाय आत्ता असलेल्या चार प्रभाग हे 2011 च्या जनगणनेनुसार केले आहेत. यामध्ये 23 गावातील 2011 ची लोकसंख्या विचारात घेऊन एकत्र येणारी लोकसंख्या व शासनाने काढलेला जीआर यानुसार तीन ऐवजी चारचा प्रभाग नव्याने करावा लागणार असल्याचे उज्ज्वल केसकर यांनी सांगितले.

 

शासनाच्या निर्णयानुसार चारचे प्रभाग करावे लागतील. त्यामुळे जास्तीत जास्त 166 प्रभाग होतील.
तसेच आत्ताच्या असलेल्या प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र देखील वाढेल असे मत केसकर यांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title :-  Pune PMC Election -2023 | Will there be 166 wards with 4 members for Pune Municipal Corporation?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political News | अजितदादा भाजपसोबत जाणार? राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले – ‘परिस्थितीनुसार निर्णय…’

Bombay High Court | मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला दणका तर शिंदे सरकारला दिलासा; BMC मध्ये 227 वॉर्ड राहणार

Black-Yellow Taxis Fares Hike In Pune | पुणे जिल्ह्यातील काळ्या- पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ, जाणून घ्या सविस्तर