Pune PMC Employees Transfer | पुणे महानगरपालिका : आठवड्याभरामध्ये 700 बदल्या ! मनपामध्ये अभियंत्यापाठोपाठ अधीक्षक व लिपिकांच्या बदल्या; शिक्षण मंडळाच्या लिपिकांची प्रथमच वॉर्ड ऑफीसमध्ये बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Employees Transfer | राजकिय पक्षांकडून टीकेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आठवड्याभरामध्ये सहा सात वर्षांपासून एकाच विभागामध्ये ठाण मांडून बसलेल्या ७०० हून अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. विशेष असे की शिक्षण मंडळाचा कारभार महापालिकेकडे आल्यानंतर अनेक वर्षे शिक्षण मंडळाकडे काम करणार्‍या १७ लिपिकांच्या वॉर्ड ऑफीसला बदल्या करून प्रशासनाने एक प्रकारे या कर्मचार्‍यांना धक्का दिला आहे. (Pune PMC Employees Transfer)

 

कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde Congress) आणि त्यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे शहरअध्यक्ष नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी अनेक वर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांमुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत प्रशासनाला तातडीने अशा अधिकारी व कर्मचार्‍यांची बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने मागील आठवड्यात १३२ कनिष्ठ अभियंते आणि शाखा अभियंत्यांची अन्य विभागात बदली केली होती. तर काल एकाच दिवसांत अधिक्षक, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ आणि कनिष्ट लिपिक अशा ६६३ जणांची बदली केली. (Pune PMC Employees Transfer)

बदली करताना सेवा ज्येष्ठतेचा विचार करण्यात आला असून यापुर्वी ज्या विभागात काम केले आहे
तो विभाग सोडून उर्वरीत विभागामध्ये संबधित कर्मचार्‍याच्या मागणीच्या प्राधान्यक्रमानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक पदावरील अधिकारी व कर्मचार्‍यांना एकत्रित बसवूनच त्यांच्या मागणीनुसार बदली करण्यात आली असून
यामध्ये पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade)
यांच्या मार्गदर्शनानुसार पारदर्शकपणे बदलीची प्रक्रिया पार पाडण्यात आली
अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (PMC Sachin Ithape) यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC Employees Transfer | Pune Municipal Corporation: 700 transfers in a week! Transfers of Superintendent and Clerks followed by Engineers in Municipal Corporation; Education board clerks transferred to ward offices for the first time

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘अजित पवारांचं वक्तव्य हे फूलस्टॉप नसून कॉमा, अजूनही काहीही होऊ शकतं’

MahaDBT | ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

Maharashtra Political News | अजित पवारांनी संजय राऊतांना का सुनावलं?, संजय शिरसाटांनी सांगितले कारण, म्हणाले…