Pune PMC Encroachment Drive | ठराविक व्यावसायीकांवर ‘अतिक्रमण’ कारवाई नको ! वरिष्ठांकडूनच आदेश येत असल्याने निरीक्षकांच्या डोक्याला ‘ताप’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Encroachment Drive | पुणे महापालिकेमध्ये Pune Municipal Corporation (PMC) महिन्याभरापुर्वी प्रशासकराज सुरू झाल्यानंतर ‘अतिक्रमण’ विभाग अचानकपणे (Pune PMC Encroachment Drive) पॉवरमध्ये आला आहे. शहरातील बेकायदा पथारी, स्टॉल, खाउ गल्ल्यांसह व साईड आणि फ्रंट मार्जीनमधील अनधिकृत व्यावसायीकांवर जोरदार कारवाई करत रस्ते मोकळे करण्यात येत आहेत (PMC Encroachment On Illegal Stalls, Unauthorized Traders In The Side And Front Main Roads In Pune). परंतू हे करत असताना वरिष्ठांकडून ‘ठराविक’ व्यावसायीकांना हात लावू नका असे आदेश येउ लागल्याने प्रत्यक्षात फिल्डवर असलेल्या निरीक्षकांना चांगलाच ‘ताप’ होउ लागला आहे. या आदेशामागे ‘आर्थिक’ कारणच असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Pune PMC Encroachment Drive)

 

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने (PMC Encroachment Department) शहरातील वाहतुकीला अडथळे ठरणार्‍या रस्त्यांवरील बेकायदा पथारी, हातगाडी, स्टॉल धारकांवर कारवाई सुरू आहे.
यासोबतच इमारतींच्या साईड आणि फ्रंट मार्जीनमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायांवरही कारवाई करण्यात येत आहे.
यापुढे जावून सर्वोच्च न्यायालयाचा दाखला (Supreme Court On Hawkers) देत २०१४ नंतर परवाना दिलेल्या स्थिर हातगाडी व्यावसायीकांना रात्री व्यवसाय संपल्यानंतर हातगाडी जागेवरून हलविण्याचेही आदेश अतिक्रमण विभागाने दिले आहेत.
तसेच हातगाडी व्यावसायीकांना नवीन भाडेदर लावण्यात आला असून मागील थकबाकी भरण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. (Pune PMC Encroachment Drive)

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे पिचलेले व्यावसायीक ‘अतिक्रमण’ विभागाच्या शुक्लकाष्ठामुळे मेटाकुटीला आले आहेत.
परंतू ही कारवाई करत असताना एकाच रस्त्यावर असलेल्या ठराविक व्यावसायीकांच्या बेकायदा शेडला हात लावू नका असे आदेशही वरिष्ठांकडून देण्यात येत असल्याने प्रत्यक्ष फिल्डवर काम करणार्‍या अतिक्रमण विभागाच्या निरीक्षकांना व्यावसायीकांच्या आरोपांना तोंड द्यावे लागत आहे.
फर्ग्युसन रस्ता (FC Road, Pune) तसेच आपटे रस्त्यावरील (Apte Road, Pune) प्रतिथयश हॉटेल व्यावसायीक तसेच एका बेकरीसह डेक्कन परिसरातील (Deccan Gymkhana, Pune) फळ विक्रेत्यांना हात लावू नका असा आदेशच वरिष्ठांनी दिले आहेत.
यामध्ये ‘आर्थिक’ कारणच असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
यासोबतच वर्षानुवर्षे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या व्यवसायांना कोणी आणि कशासाठी अभय दिले ?
असा प्रश्‍नही सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जावू लागला आहे.

 

 

Web Title :- Pune PMC Encroachment Drive | No encroachment action on certain traders PMC Encroachment Department inspector doing work as orders are coming from the seniors officers of Pune Municipal Corporation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा