Pune PMC Medical Education Trust | भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी शिक्षक व कर्मचारी भरती होणार

सेवा प्रवेश नियमावलीला महापालिका प्रशासनाची मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Medical Education Trust | महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची (Bharatratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital, Pune) सेवा प्रवेश नियमावली तयार करण्यात आली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या या महाविद्यालयासाठी आवश्यक प्राध्यापक व कर्मचार्‍यांची कायमस्वरूपी भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक साहित्य खरेदीचे अधिकार महाविद्यालयाच्या डीनना देण्यात आले आहेत. महाविद्यालयासाठी डॉ. नायडू रुग्णालयाच्या जागेवर इमारत उभारणीसाठी देखिल तयारी सुरू असून निवडणुकांनंतर महापौरांनी पदग्रहण केल्यानंतर या इमारतीसाठी सीएसआरच्या माध्यमांतून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC Medical Education Trust)

 

महापालिकेच्या भारतरत्न वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय यावर्षीपासून सुरू झाले आहे. पहिल्या वर्षासाठी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. महाविद्यालयाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. यासाठी हॉस्टेलच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यायामशाळा, खेळाचे मैदान व अन्य आवश्यक गोष्टी चांगल्या दर्जाच्या मिळतील याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पहिलेच वर्ष असल्याने निश्‍चितच काही त्रुटी आहेत. त्या लवकरात लवकर दूर करून कायमस्वरुपी यंत्रणा भक्कम करण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक साहित्यासोबतच कार्यालयीन वापरासाठी लागणार्‍या गोष्टींच्या खरेदीचे निर्णय डीन कडे सोपविण्यात आले आहेत. (Pune PMC Medical Education Trust)

महाविद्यालयासाठी लागणारे प्राध्यापक, विविध विभागातील तज्ञ तसेच कर्मचार्‍यांची सेवा प्रवेश नियमावली तयार केली आहे.
त्यानुसार कायमस्वरूपी पदे भरण्यात येणार आहेत. तूर्तास तात्पुरत्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
सेवा प्रवेश नियमावलीला शासनाची मान्यता घेउन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असेही विक्रम कुमार यांनी यावेळी नमूद केले.

 

 

Advt.

Web Title :- Pune PMC Medical Education Trust | Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College will have permanent teachers and staff recruitment

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा