Pune PMC News | समाविष्ट 34 गावांतील 438 ऍमेनिटी व ओपन स्पेसेस ‘कागदोपत्री’ महापालिकेच्या ताब्यात

‘सद्यस्थिती’ तपासूनच जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबविण्याचा महापालिकेचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पीएमआरडीएने  (PMRDA) महापालिकेमध्ये (Municipal Corporation) समाविष्ट झालेल्या 34 गावांमधील 438 ओपन आणि अ‍ॅमेनिटी स्पेस (PMC Amenity Space) नुकतेच कागदोपत्री महापालिकेला हस्तांतरीत केल्या आहेत. परंतू या जागा अतिक्रमण मुक्त तसेच सिमाभिंत घालून बंदीस्त करून द्याव्यात असे पीएमआरडीएला (Pune PMC News) कळविले आहे.

 

महापालिकेमध्ये समावेश होण्यापुर्वी 34 गावांचा कारभार पीएमआरडीएच्या (Pune PMC News) माध्यमातून करण्यात येत होता. 2018 मध्ये 11 गावे आणि दीड वर्षापुर्वी 23 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. 11 गावांचा विकास आराखडा (Development Plan) महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असून 23 गावांचा विकास आराखडा पीएमआरडीए करत आहे. सप्टेंबरपर्यंत हा विकास आराखडा तयार होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही गावे महापालिका हद्दीत आली असली तरी अद्याप बांधकाम परवानगी पीएमआरडीएच्या माध्यमातूनच करण्यात येत आहे. तसेच येथील शाळा, दवाखाने व अन्य आस्थापना या जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत. (Pune PMC News)

 

समाविष्ट गावांतील (Village Included) शाळा, दवाखाने व अन्य आस्थापना महापालिकेच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी पीएमआरडीएच्या हद्दीत असलेल्या अ‍ॅमेनिटी स्पेस ओपन स्पेसेस महापालिकेच्या ताब्यात द्याव्यात यासाठी पाठपुरावा सुरू होता. जेणेकरून या जागांवर नागरी सुविधा निर्माण करणे शक्य होणार आहे. नुकतेच पीएमआरडीएने 438 ओपन आणि ऍमेनिटी स्पेस कागदोपत्री महापालिकेला सोपवल्या आहेत. या जागांची सद्यस्थितीबाबत महापालिकेला कुठलिच माहिती देण्यात आलेली नाही.

महापालिका प्रशासनाने या जागा ताब्यात घेण्यापुर्वी त्या अतिक्रमण मुक्त तसेच नियमानुसार त्या सिमाभिंत आणि गेट लावून बंदीस्त केल्या आहेत का याची खातरजमा करून घेतली जाणार असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकार्‍यांना स्पष्ट केले आहे.  यासंदर्भात महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (Asset Management Department) उपायुक्त राजेंद्र मुठे (Deputy Commissioner Rajendra Muthe) यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बांधकाम परवानगी देताना महापालिका ऍमेनिटी स्पेस व ओपन स्पेस म्हणून मिळालेल्या जागा संबधित जागा मालकाकडून सिमाभिंत व गेट लावूनच बंदिस्त करून ताब्यात घेते.
पीएमआरडीएने नुकतीच 438 जागांची कागदपत्रे सोपविली आहे.
परंतु जागा ताब्यात घेताना जागा बंदिस्त करूनच महापालिकेच्या ताब्यात द्यावी, असे पीएमआरडीएला कळविले आहे.

 

पीएमआरडीएने 8 ओपन स्पेसेस दिल्या भाडेतत्वावर
पीएमआरडीएने महापालिकेला सोपविलेल्या 438 अ‍ॅमेनिटी स्पेस पैकी 8 जागा या भाडेतत्वावर दिल्या आहेत.
हे भाडेकरार गावे महापालिकेत समाविष्ट होण्यापुर्वी केले आहेत किंवा नंतर याची माहिती महापालिका प्रशासन घेत आहे.
ही माहिती आल्यानंतर भाडेकरार अथवा भाडे कोणी घ्यायचे याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राजेंद्र मुठे यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | 438 amenities and open spaces in 34 villages included in the possession of ‘Kagadpatre’ Municipal Corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Rickshaw Fare Increase | पुण्यात 1 ऑगस्ट पासून रिक्षाची भाडेवाढ ! ‘सीएनजी’ दरवाढीचा थेट फटका प्रवाशांच्या खिशाला बसणार

 

Katrina-Vicky Death Threat | कतरिना कैफ-विकी कौशल यांना ठार मारण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत

 

Pune News | तलावाच्या मधोमध गेल्यावर लागला दम, महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू