Pune PMC News | पुणे महानगरपालिकेकडून रस्ते दुरुस्तीची सुमारे 80 टक्के तर पावसाळी कामे 26 टक्के पुर्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | पुण्यात जेवढ्या जास्त प्रमाणात उन्हाचे चटके बसले आहेत तितक्याच जास्त प्रमाणात श्रावणधारा बरसतील असा अंदाज लावला जातोय. पावसाळ्यापूर्वी करावयाची रस्ते दुरुस्ती, पावसाळी गटारे आणि नालेसफाईची कामे करण्यास पालिकेने प्रारंभ केला असून आत्तापर्यंत 26 टक्के काम पूर्ण झाले आहे (Works To Be Done Before Monsoon By PMC). उर्वरित संपूर्ण काम येत्या 10 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली आहे. (Pune PMC News)

मागील पावसाळ्यात पुण्याचे झालेले हाल व शहरात जागोजागी झालेली दुर्वस्था यावरून महापालिकेला चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. पालिकेच्या कारभाराचा व निकृष्ट दर्जाच्या कामाचा सर्वांकडून समाचार घेण्यात आला होता (Pune Corporation News). त्यामुळे चालू वर्षी सुरू असलेल्या पावसाळी कामांचा महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी गुरुवारी आढावा घेतला. आणि या वर्षी कामास अधिक जोमाने सुरूवात केलेली असून रस्ते दुरुस्तीची 80 टक्के कामे झालेली आहेत, तर शहरातील पावसाळी गटारे व नाले सफाईची 26 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. पावसाळी गटारे स्वच्छ केल्यानंतर काढण्यात येणारा कचरा विनाविलंब उचलून नेण्यात येत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच केबल व अन्य सेवा वाहिन्यांसाठी खोदाईची परवानगी देताना 31 मे पूर्वी खोदाई केलेल्या रस्त्यांची
शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी व
ठेकेदारांवर कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Vikram Kumar ) यांनी दिले आहेत.
एमएनजीएल गॅस (MNGL Gas) वाहिनी पाणीपुरवठा आणि एमएसईबी (MSEB) सारख्या अत्यावश्यक कामांसाठी मात्र 10 मे पर्यंत खोदाईची परवानगी देण्यात आली आहे. (Pune PMC News)

महापालिकेमध्ये नवीन समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये 385 कोटी रुपयांची ड्रेनेजलाईनची सध्या कामे
सुरू आहेत. आराखड्यानुसार ड्रेनेज लाईनची कामे करताना काही ठिकाणी खासगी जागेतून पाईप लाईन टाकाव्या लागणार आहेत. त्यासाठी जागा मालकांचा विरोध होत आहे.
अशा ठिकाणी वरिष्ठस्तरावर विनंती करून जागा मालकांची परवानगी घेण्यात येईल.
मात्र, यानंतरही विरोध कायम राहिल्यास कायद्याचा वापर करून ड्रेनेज लाईनची कामे करण्यात येतील,
असे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

Web Title :- Pune PMC News | About 80 percent of the road repair by Pune Municipal Corporation and 26 percent of monsoon works are complete – IAS Vikram Kumar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Keshav Nagar Crime | गाव गुंडांवर ठोस कारवाई आवश्यक ! सर्व नागरिकांनी एकत्र येऊन उपाययोजना करु, मुंढवा-केशवनगर मधील नागरिकांचा सूर

IPS Vishwas Nangare Patil | आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आवाहन; म्हणाले – ‘माझ्या नावाने बनावट खातं, सावध रहा’

Pune Crime News | मैत्रिणीनेच मैत्रिणीला घातला 69 लाखांचा गंडा ! काका पोलीस असल्याचे सांगून धमकाविले, पोलिस कर्मचार्‍यासह 6 जणांवर फसवणूकीचा गुन्हा