Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मनपा व खासगी शाळा उद्यापासून (दि.15) नियमित सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | राज्यात अजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडल्याचं चित्र आहे. पुणे जिल्ह्यात रेड (Red Alert) तर शहरात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी (Schools Closed) जाहीर करण्यात आली होती. मात्र, उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील सर्व शाळा नियमीतपणे सुरु (School Reopen) राहतील असे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने (Rain in Pune) सांगण्यात आले आहे. (Pune PMC News)

 

पुणे शहरात पडत असलेल्या पावसामुळे (Pune Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहतुक कोंडी (Traffic Jam) मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये पाणी जमा झाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. अशी स्थिती असताना हवामान खात्याने (IMD) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. (Pune PMC News)

 

मुसळधार पाऊस असताना विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचताना अनेक समस्या येत आहेत.
स्कूलबस, व्हॅन विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर घरी सोडण्यासाठी वेळ लागत आहे.
अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसू नये यासाठी पुणे महापालिकेने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता.

 

पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या (PMC Education Department) प्रशासकीय अधिकाऱ्यांनी
सर्व मनपा व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा उद्या दिनांक 15 जुलै पासून नियमितपणे सुरु राहतील असे सांगितले आहे.

 

Web Title :- Pune PMC News | All Municipal and Private Schools within the limits of
Pune Municipal Corporation will start regular from tomorrow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा