Pune PMC News | मुंढव्यातील गोठेधारकांना जागा वाटप करण्यास तूर्तास स्थगिती – मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शहरातील गोठेधारकांच्या पुर्नवसनासाठी वाटप करण्यात येणार्‍या मुंढवा येथील जागेचे वाटप तूर्तास थांबविण्यात आले आहे. या जागेचे मोनार्क या कंपनीकडून फेरसर्वेक्षण करून सुधारीत प्लॉटींग करून घेण्यात येणार असून यानंतरच गोठेधारकांना जागा वाटप करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade PMC) यांनी दिली. (Pune PMC News)

 

शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या गुरांच्या गोठ्यांचे मुंढवा येथील महापालिकेच्या जागेमध्ये पुर्नवसन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून प्रत्यक्षात पुर्नवसनाला सुरूवातही केली आहे.
दरम्यान, महापालिकेने काही महिन्यांपुर्वी ८८ गोठेधारकांचे पुर्नवसन करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली.
यामध्ये क्षेत्रीय कार्यालयाकडून आलेल्या प्रस्तावांनुसार गोठेधारकांची अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मिटींगही झाली.
या बैठकीमध्ये रिक्त जागांवर ८८ गोठेधारकांना प्लॉट्सही उपलब्ध करून देण्यात आले.
विशेष असे की कोरोना काळात ही बैठक ऑनलाईन झाली होती.
जागा वाटपानुसार काही गोठेधारकांनी महापालिकेची फी देखिल बँकेमध्ये भरली. (Pune PMC News)

मात्र, प्रत्यक्षात वाटपामध्ये मिळालेला प्लॉट क्रमांक जागेवर अस्तित्वात असला तरी प्रत्यक्षात त्याठिकाणी यापुर्वीच गोठा असल्याचे काहींच्या निदर्शनास आले.
काही ठिकाणी पक्क्यास्वरूपाचे बांधकाम करून तेथे भंगार व अन्य व्यवसाय सुरू असल्याचेही ज्यांना जागा वाटप करण्यात आली आहे, त्यांच्या निदर्शनास आले.
तर काही प्लॉट्सची जागा ही चक्क नदीपात्रातही असल्याचे आढळून आले.
यामुळे ८८ पैकी जवळपास ३० गोठेधारकांनी वस्तुस्थितीनिहाय पत्र पाठवून महापालिकेकडे नवीन प्लॉट्सची मागणी केली.
दरम्यानच्या काळामध्ये गोठे वाटपामध्ये काही माननीयांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून हेराफेरी केल्याच्या तक्रारीदेखिल प्रशासनाकडे आल्या होत्या.
भाजपचे सरचिटणीस संदीप लोणकर यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार करून गैरव्यवहार करणारे अधिकारी व माननीयांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी केली होती.

 

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले की गोठेधारकांच्या तक्रारीनंतर गोठे वाटपाची प्रक्रिया तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
गोठेधारक, माती पासून विविध वस्तू तयार करणारे कुंभार व्यावसायीक तसेच भट्ट्यांचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायीकांच्या पुर्नवसनासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागांचे पुन्हा एकदा मॅपिंग केले जाणार आहे.
सध्याचे व्यावसायीक आणि गोठेधारकांना ज्या कारणासाठी जागा लिजवर देण्यात आल्या आहेत,
त्याठिकाणी तोच व्यवसाय केला जातोय का याचेही सर्वेक्षण केले जाणार आहे.
या कामासाठी मोनार्क या संस्थेची नियुक्ती करण्यात येत आहे.
या संस्थेच्या अहवालानंतरच जागा वाटप सुरू करण्यात येणार आहे.
गोठे धारकांसाठी १० जनावरांमागे दीड गुंठे जागा असे प्रमाण ठरविण्यात आले आहे.

 

 

Web Title : –  Pune PMC News | Allotment of land to cattle owners in Mundhwa suspended for the time being Municipal Additional Commissioner Ravindra Binawade

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा