Pune PMC News | ड्रेनेज लाईन पावसाळी गटारांना जोडण्यात आल्याने ‘महेश सोसायटी’ चौकात मैलापाणी रस्त्यावर

ड्रेनेज लाईन, पावसाळी गटारे आणि कर्ल्व्हटच्या कामासाठी महापालिकेचा 8 कोटींचा आराखडा

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | ड्रेनेज लाईन्स (Drenej Lines) पावसाळी गटाराला जोडल्याने बिबवेवाडी (Bibvewadi) येथील ऐन वर्दळीच्या महेश सोसायटी (Mahesh Society Bibwewadi) चौकामध्ये पावसाळ्यात चार महिने मैला पाणी रस्त्यावरून वाहात असते. विशेष असे की स्वामी विवेकानंद रस्त्याचे कॉंक्रीटीकरणाचे काम करताना प्रशासन आणि या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देणार्‍या लोकप्रतिनिधींच्याही ही बाब लक्षात न आल्याने बिबवेवाडी तील हजारो नागरिकांना मैला पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, या समस्येवर उपाय म्हणून येथील ड्रेनेज लाईन व पावसाळी लाईन्स स्वतंत्र करण्यात येणार असून चौकात मोठ्या आकाराचा कलव्हर्ट बांधण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतील अधिकार्‍यांनी (PMC Officers) दिली. (Pune PMC News)

 

पावसाळ्यात बिबवेवाडी येथील महेश सोसायटी चौकामधील गटारामधून मैलामिश्रीत पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने येथील वाहतूकीचा खोळंबा तर होतोच परंतू नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या गटाराचे चेंबर चौकातच असल्याने महेश सोसायटी, चिंतामणीनगर भाग दोन, पोकळेवस्ती, अप्पर इंदिरानगर २७६ ओटा भागातील नागरिकांसोबतच पुढे सुखसागरनगर, कात्रजकडे जाणार्‍या नागरिकांनाही मोठा त्रास होतो. दीड वर्षांपुर्वी येथील स्वामी विवेकानंद रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम करण्यात आले. त्यावेळी अप्पर येथून खालीलबाजूस येताना मोठ्या व्यासाची पावसाळी गटारलाईन टाकण्यात आली आहे. नेमके महेश सोसायटी चौकातील महेश सोसायटीच्या प्रवेशद्वारातच अरूंद कल्व्हर्टमध्ये ही लाईन जोडण्यात आली आहे. (Pune PMC News)

जागडेचाळ येथून महेश सोसायटीतून येणारा बंदीस्त लाईनमधून वाहणारा पावसाळी नैसर्गिक नालाही याच कल्व्हर्टमध्ये सोडण्यात आला आहे. या नैसर्गिक नाल्याला अनेक ठिकाणी ड्रेनेजलाईनही जोडण्यात आले आहे. अशातच या कल्व्हर्टमधून पाण्याच्या लाईन्स, केबल्सही पास करण्यात आलेल्या आहेत. यामुळे नाल्यातून वाहत येणारे कचरा, घरातील गाद्या, उशांसारख्या टाकाउ वस्तुदेखिल कल्व्हर्टमध्ये अडकून प्रवाहात अडथळा निर्माण होतो. व मैलामिश्रीत पाणी चौकातून वाहते. यामुळेच सुमारे दीड ते दोन लाख लोकांना दररोज त्रास सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.

यासंदर्भात महापालिकेचे कार्यकारी अभियंता विलास फड (Executive Engineer Vilas Phad) यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले महेश सोसायटी चौकातील कल्व्हर्टमध्ये पावसाळी लाईनसोबतच नैसर्गिक बंदीस्त नालाही जोडण्यात आला आहे.
कल्व्हर्ट खूपच लहान आकाराचा असल्याने कचरा अडकून पाणी रस्त्यावर पसरते ही वस्तुस्थिती आहे.
याठिकाणचे सर्वेक्षण करण्यात आले असून पावसाळी गटारे व ड्रेनेज लाईन स्वतंत्र करण्यात येणार आहे.
तसेच कल्व्हर्टही मोठ्या आकाराचे करण्यात येणार आहे.
या चौकातून पावसाळी लाईन के.के.मार्केटच्या (K.K. Market Pune) दिशेने आंबिल ओढ्याला (Ambil Odha) मिळते.
ही लाईन स्वतंत्र केल्याने रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल.
या कामासाठी ८ कोटी रुपये खर्च असून यासंदर्भातील प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune PMC News | As the drainage line was connected to the rain drains,
the dirty water on the street at Mahesh Society Chowk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा