Pune PMC News | पालखी सोहळ्यातील ज्येष्ठ वारकर्‍यांना कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस ! महापालिकेने 20 ठिकाणी केली औषधोपचाराची सुविधा

मागणी आल्यास शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिरांचे आयोजन - विक्रम कुमार, महापालिका आयुक्त व प्रशासक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पालखी सोहळ्यादरम्यान (Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2022) शहरात २० ठिकाणी वारकर्‍यांना औषधोपचाराची सुविधा करण्यात येणार असून याठिकाणी ६० वर्षांवरील वारकर्‍यांना कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस (Corona Vaccine Booster Dose) देण्यात येईल. तसेच शहरातील शाळांमध्ये १२ वर्षांवरील मुलांसाठी शाळांच्या मागणीनुसार लसीकरणाचे कॅम्पही भरविण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

आषाढी वारीनिमित्त पुढील आठवड्यात शहरात संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालख्या येणार आहेत. पालखी मार्गावर तसेच मुक्कांमांच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेसोबतच पाणी व आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने तयारीही करण्यात येत आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकर्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टीने २० ठिकाणी औषधोपचारांची सुविधा करण्यात येणार आहे. याठिकाणी ६० वर्षांवरील वारकर्‍यांना कोरोनावरील लसीचा मोफत बूस्टर डोसही देण्यात येणार आहे. बूस्टर डोससाठी वारकर्‍यांनी आधार कार्ड आणि दोन डोस घेतल्याचे सर्टीफिकेट सोबत ठेवल्यास लसीकरणाची प्रक्रिया अधिक सोपी होईल, असे आवाहनही कुमार यांनी केले आहे. (Pune PMC News)

सध्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज नवीन १९३ पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरीत सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे असून घरीच उपचार घेत आहेत. लहान मुलांना कोरोनाची लागण होण्यापासून रोखण्यासाठी लसीकरण वाढविण्यात येणार आहे. प्रामुख्याने १२ वर्षावरील शालेय मुलांचे लसीकरण करण्यासाठी शाळांमध्येच लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी शाळांकडून आलेल्या मागणीनुसार वेळापत्रकाचे नियोजन करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नमूद केले.

 

Web Title :- Pune PMC News | Booster dose of corona vaccine to senior Warkaris at Palkhi ceremony! Municipal Corporation has provided medical facilities at 20 places

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Medical Education Trust | भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी शिक्षक व कर्मचारी भरती होणार

 

Ajit Pawar | ‘देहूमधील कार्यक्रमाबद्दल मला काहीच बोलायचे नाही’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

 

Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा ! चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि 500 रुपये मिळवा