Pune PMC News | नगर रोडवरील बीआरटी मार्ग अखेर इतिहासजमा; वाहतूकीला अडथळा होत असल्याने महापालिकेने काढून टाकला बीआरटी मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | हजारो कोटी रुपये खर्चुन गाजावाजा केला गेलेला, परंतु, अर्धवट अंमलबजावणी केली गेल्याने अडथळा ठरलेला नगर रोडवरील बीआरटी मार्ग (BRT Marg Nagar Road) अखेर महापालिकेने (Pune PMC News) मध्यरात्री कारवाई करुन तो काढून टाकला.

कात्रज – स्वारगेट – हडपसर हा देशातील पहिला बीआरटीमार्ग सुमारे १५ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आला होता. त्यावर जवळपास १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, त्याची अंमलबजावणी अर्धवट करण्यात आल्याने तो नेहमीच वादाचा आणि अपघाताचा विषय ठरला होता. त्यात काही काळाने उड्डाणपुलामुळे काही मार्गावरील बीआरटी काढून टाकावी लागली. स्वारगेट ते हडपसर हा मार्गही काढून टाकण्याची वेळ आली. (Pune PMC News)

नगर रोडवरील बीआरटी मार्ग बांधताना त्यामधील दुभाजकाला मोठी जागा सोडली गेली. त्याचा परिणाम बाजूचा रस्ता लहान झाल्याने वाहतूक कोंडीत (Pune Traffic Jam) भर पडत गेली. त्यात मेट्रोचे काम या बीआरटी मार्गाच्या मध्येच सुरु करण्यात आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता. बीआरटी सुरु नसताना त्याचे अवशेष वाहतूकीला अडथळा निर्माण करत होते. त्यामुळे हा बीआरटी मार्ग काढून टाकण्याची मागणी वारंवार होत होती. याबाबत अहवाल देण्यासाठी गोखले इन्स्टिट्युटची नियुक्ती केली होती. त्यांनी हा मार्ग काढून टाकण्याची शिफारस केली होती. त्यानंतर नगर रोडवरील पर्णकुटी ते विमाननगरमधील फिनिक्स मॉलपर्यंतचा १.८ किलोमीटरच बीआरटी मार्ग मध्यरात्री महापालिकेने उखडून टाकला आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakne) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Ajit Pawar Group | अधिवेशनापूर्वीच वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचे कार्यालय अध्यक्षांनी दिले अजित पवार गटाला

कामगारांचा पीएफ न जमा केल्याप्रकरणी हॉटेलच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल; बालेवाडीतील प्रकार

‘तू म्हाताऱ्या माणसावर दादागिरी का करतो’, तरुणावर कोयत्याने वार; पिंपरीतील घटना

बीआरटी मार्गातून जाताना पीएमटीला धडकून अल्पवयीन मुलीचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी

PSI- Cop Dismissed In Pune | पुण्यात महिला पोलिस अधिकार्‍यासह दोघे सेवेतून बडतर्फ, जाणून घ्या प्रकरण

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक