Pune PMC News | महापालिका भवनच्या विस्तारीत इमारतीमध्ये छताचा पंखा कोसळला; दुर्घटनेत महिला सुरक्षा रक्षकाचा गाल फाटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | उदघाटनाच्या वेळीच छताच डिझाईन कोसळल्याची पार्श्‍वभूमी असलेल्या महापालिका भवनच्या विस्तारीत इमारतीत शनिवारी वेगात फिरणारा छतावरील पंखा कोसळला. या दुर्घटनेते खाली बसलेले दोन सुरक्षा रक्षक (Security Guard) जखमी झाले. यामध्ये जखमी झालेल्या महिला सुरक्षा रक्षकाच्या गालावर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या सहकार्‍याच्या डोक्याला मार लागला आहे. (Pune PMC News)

 

महापालिका भवनच्या नवीन विस्तारीत इमारतीमध्ये तळमजल्यावर मुख्य लिफ्टच्या प्रवेशद्वारासमोर संपुर्ण इमारतीतील सीसीटीव्ही यंत्रणेतील सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. याठिकाणी सुरक्षा रक्षक बसून मॉनिटरींग करत असतात. याठिकाणी सुरक्षा रक्षकांना बसण्यासाठी टेबल खुर्च्या ठेवण्यात आल्या असून साधारण दीड वर्षांपुर्वी येथील छतावरील बीमला फासनर लावून पंखाही बसविण्यात आला होता. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंखा ज्या पाईपच्या सहाय्याने फासनरमध्ये अडकविला होता, तो पाईप भिजून तुटल्याने पंखा कोसळला. त्यावेळी खाली बसलेल्या एका महिला कर्मचार्‍याचा गाल फाटला तर त्यांच्या पुरूष सहकार्‍याच्या डोक्याला दुखापत झाली. पंख्याच्या पात्यामुळे गाल फाटल्याने जबड्याच्या आतील व बाहेरील बाजूने टाके घालावे लागल्याची माहिती काही सुरक्षा रक्षकांनी दिली. (Pune PMC News)

 

यासंदर्भात विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल (Srinivas Kandul) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला.
हा पंखा कधी लावण्यात आला याची माहिती घेउन संबधित अधिकारी व ठेकेदाराविरूद्ध कारवाई करण्यात येईल.
तसेच संपुर्ण इमारतीतील पंखे व विद्युत विभागाशी संबधित उपकरणांची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती कंदुल यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | Ceiling fan collapses in Mahapalika Bhawan extension building; The cheek of the female security guard was torn in the accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांचे टोचले कान, नेत्यांना दिले ‘हे’ आदेश

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये पाऊस पडला ‘या’ प्रकारे जाहीर करण्यात येणार विजेता, आयसीसीचे नवीन नियम

Pune PMC News | पुणे मनपामध्ये करणार आणखी 200 हून अधिक पदांची भरती; आरोग्य आणि अग्निशामक दलामधील भरतीस प्राधान्य