Pune PMC News | पुणे महापालिकेवर प्रशासक राजची वर्षपूर्ती ! अर्धवट प्रकल्पांना गती व नव्या प्रकल्पांची मुहुर्त मेढ

धोरणात्मक निर्णयाऐवजी प्रशासकीय कामकाजात सुधारणेवर भर दिला – महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुणे महापालिकेमध्ये प्रशासक (PMC Administration) राज सुरू होउन एक वर्ष पुर्ण झाले आहे. या वर्षभरामध्ये नवीन प्रकल्पांसोबतच जुने प्रकल्प पूर्ण करण्यासच अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. प्रामुख्याने विविध कामांमुळे खोदलेले 128 रस्ते पुर्ववत करण्यासोबतच महापालिकेच्या सेवा ऑनलाईन देण्यात यश आले आहे. आगामी काळामध्ये भांडवली कामांवरील खर्च वाढत जाणार असून नवीन प्रकल्पांसाठी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे मत महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी व्यक्त केले. (Pune PMC News)

 

पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका (Pune PMC Elections) लांबल्याने 15 मार्च 2022 पासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC) यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमांतून चालविण्याची ही तशी पहिलीच वेळ होती. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडताना नगरसेवकांशिवाय शहराचे व्यवस्थापन करणे हे प्रशासनापुढे आव्हान होते. नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांचे अगदी छोटे- मोठे प्रश्‍न मांडून त्यांची सोडवणूक केली जाते. तसेच नागरिकांच्या हिताच्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते. या पार्श्‍वभूमीवर प्रशासकाच्या राजवटीत ज्याठिकाणी नगरसेवकांच्या माध्यमातून मांडल्या जाणार्‍या नागरिकांच्या मागणीचा अभाव राहील्याने कुठलेही धोरणात्मक निर्णय घेतले गेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतू त्याचवेळी प्रशासकीय पातळीवरील सुधारणांचा राहीलेला मोठा बॅकलॉग पूर्ण करण्याची संधी यानिमित्ताने प्रशासनाला मिळाली, असे विक्रम कुमार यांनी सांगितले. (Pune PMC News)

विक्रम कुमार यांनी सांगितले, की मागील वर्षभरामध्ये शहरात विविध कारणांमुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली होती. पावसाळ्यामध्ये रस्त्यांवरील खड्डयांच्या समस्येने टीकेचा भडीमार झाला. मात्र, मागील चार महिन्यांत शहरातील तब्बल 128 रस्त्यांची नव्याने कामे करण्यात हाती घेण्यात आली आहेत. यासाठी ३५० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळ्यापुर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडीकल कॉलेजच्या इमारतीचे काम सुरू करण्यात आले असून गदीमा स्मारकाच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली आहे.

 

महापालिकेच्या अधिकाअधिक सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले असून त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. मिळकतकर व अन्य सुविधांसाठी चॅटबॉट , शहरी गरीब योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी ऑनलाईन सुविधा, शहरातील कोणत्या भागामध्ये कोणती विकासकामे केली त्यावर किती खर्च झाला याचे सॉफ्टवेअर तयार केले असून लवकरच नागरिकही ते पाहू शकतील, नदीकाठ सुधार आणि नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. मागील वर्षभरात जागतिक जी 20 परिषदेचे आयोजन करण्याची संधी महापालिकेला मिळाल्याने अनेक सुधारणा करता आल्या. यासोबतच पाण्याचे प्रदूषण रोखून पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी देशपातळीवरील 97 शहरांचा सहभाग असलेल्या धारा 2023 परिषदेचे आयोजन करण्याची संधी महापालिकेला मिळाली. यासोबतच महापालिकेमध्ये विविध पदांवरील 400 हून अधिक पदांची पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यात यश आल्याचे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

भविष्यातील आव्हान
महापालिकेच्या भौगोलिक विस्तारासोबतच व्यवस्थापनाचा तसेच विकासकामांवरील खर्च वाढत जाणार आहे.
महापालिकेला पुढीलवर्षीपासून ३ हजार कोटी रुपये केवळ वेतनावरील खर्च आहे.
वीजेचा खर्चही ३५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यासोबतच अन्य भांडवली खर्चही वाढत असून नवीन प्रकल्पांसाठी मोठ्याप्रमाणावर निधी लागणार आहे.
महापालिकेला जीएसटीतून 2 हजार 400 कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे.
यंदा मिळकत करामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. तसेच 40 टक्के कर सवलतीबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांत होण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेला मिळकत करातून 1 हजार 800 रुपये उत्पन्न मिळेल. तसेच पीएमआरडीएकडून देखिल बांधकाम परवानगीचे उत्पन्न मिळेल.
परंतू समाविष्ट गावांतील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार असून अगोदर सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधिची गरज भासणार आहे. यामुळे महापालिकेचे उत्पन्न देखिल वाढवावे लागणार आहे.
राज्य शासनाने समाविष्ट गावांचा विचार करून जीएसटीचा हिस्सा वाढवून द्यावा,
अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच अन्य पर्यायांचाही विचार सुरू असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune PMC News | Completion of the year of Administrator Raj on Pune Municipal Corporation! Acceleration of partial projects and timely start of new projects

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune APMC Election 2023 – Haveli Market Committee | हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतांचा ‘भाव’ फुटला!

karishma Kapoor | ‘या’ कारणामुळे मी इतकी वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर होते; करिश्मा कपूरने केला मोठा खुलासा

Oscars Award 2023 | ऑस्करने मोडला रेकॉर्ड ! कोणत्याही वाद-विवादाशिवाय पार पडला यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा