Pune PMC News | उरूळी देवाची- फुरसुंगी गावे वगळण्याचा निर्णय प्रलंबित; पुणे महापालिकेने अंदाजपत्रकातून ही गावे वगळल्याने नागरिक संकटात !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | उरूळी देवाची (Uruli Devachi) आणि फुरसुंगी (Fursungi) या दोन गावांबाबत राज्य शासनाचा (Maharashtra State Govt) निर्णय अधांतरीत राहील्याने या दोन गावांपुढे भलतेच संकट उभे राहीले आहे. ही गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने महापालिकेने आगामी २०२३-२४ या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये या गावांसाठी निधीची तरतूदच केली नसल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. ही दोन गावे वगळण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने या गावांतील विकासकामे व सुविधा बंद केल्या असून अद्याप गावे वगळण्याची व स्वतंत्र नगरपालिका करण्याची प्रक्रिया न झाल्याने या गावांना ‘वाली’ कोण? असा प्रश्‍न स्थानीक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. (Pune PMC News)

 

भाजप शिवसेना युती सरकारने २०१७ मध्ये ११ गावांचा महापालिकेमध्ये समावेश केला आहे. महापालिकेने या गावांत कर आकारणी केली आहे. हा कर ग्रामपंचायतीपेक्षा अधिक असल्याने गावे वगळावीत व स्वंतत्र नगरपालिका करावी, अशी मागणी उरूळी देवाची आणि फुरसुंगीतील काही ग्रामस्थांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे (Shinde-Fadnavis Govt) केली. माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एका बैठकीमध्ये मान्यता दिली. या मान्यतेनंतर महापालिकेने या गावांमध्ये सुरू करण्यात आलेली विकासकामे थांबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, पथदिवे, रस्ते अशा अनेक कामांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने ही गावे वगळण्याबाबत ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे. परंतू शासन पातळीवर अद्याप गावे वगळण्याच्या अंतिम निर्णयाला मान्यता दिलेली नाही. दुसरीकडे ही गावे महापालिकेमध्येच ठेवावीत केवळ मिळकत करामध्ये नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांचा मोठा गट कायदेशीर व रस्त्यावरील लढा देत आहे. यामुळे राज्य शासनही बुचकळ्यात पडले आहे. (Pune PMC News)

दरम्यान, गावे वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर महापालिकेचे पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार होत आहे. या अंदाजपत्रकामध्ये या दोन्ही गावांसाठी निधी देण्यात आलेला नाही, अशी माहिती प्रशासनातील अधिकार्‍यांनी दिली आहे. तसेच राज्य सरकारनेही या गावांतील विकासकामांसाठी फारशी भरीव तरतूद केलेली नाही. त्यामुळे या गावांना येत्या काळात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. गावे वगळण्याचा निर्णय घेणारे राजकिय पुढारी याबाबत मात्र जाणीवपूर्वक मिठाची गुळणी धरून बसल्याचा आरोप स्थानीक ग्रामस्थ करत आहेत.

 

पाणी पुरवठा योजनेचे काम ठप्पच
राज्य शासन आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कचरा डेपोमुळे बाधित उरूळी देवाची आणि फुरसुंगी
या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे.
या योजनेचे काम मागीलवर्षी जून महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते.
परंतू ते अद्यापही पूर्ण न झाल्याने नागरिकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
या गावांना सध्या महापालिकाच टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहे. महापालिकेने पाणी पुरवठा योजनेतून लक्ष काढून घेतले आहे.
त्याचवेळी गावे वगळण्याचा निर्णय झाल्याने टँकरने पाणी पुरवठ्यासाठीही आगामी अंदाजपत्रकात फारशी तरतूद केली
नसल्याने या गावांपुढे येत्या काळात पाण्याची समस्या निर्माण होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Decision on exclusion of Uruli Devachi-Fursungi villages pending; Citizens in crisis as Pune Municipal Corporation excluded these villages from the budget!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune APMC Election 2023 – Haveli Market Committee | हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतांचा ‘भाव’ फुटला!

karishma Kapoor | ‘या’ कारणामुळे मी इतकी वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर होते; करिश्मा कपूरने केला मोठा खुलासा

Oscars Award 2023 | ऑस्करने मोडला रेकॉर्ड ! कोणत्याही वाद-विवादाशिवाय पार पडला यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा