Pune PMC News | समाविष्ट 23 गावांतील रस्त्यांच्या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविणार – पुणे मनपा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुणे महापालिकेमध्ये Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांतील रस्त्यांच्या कामासाठी पुढील आठवड्यात एस्टीमेट करण्यात येणार असून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. शहरातील ज्या रस्त्यांवर सेवा वाहीन्यांची कामे झाली आहेत किंवा पुढील तीन ते चार वर्षांत अन्य कुठलिही कामे होणार नाहीत असे ५७ रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत, अशी माहीती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

खड्डेमय रस्त्यांमुळे टीकेचे धनी बनलेल्या महापालिकेने पावसाळा संपताच शहरातील रस्ते खड्डेमुक्त आणि तसेच दुरूस्त करण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. प्रामुख्याने चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे खड्डेमय झालेल्या गर्दीच्या ठिकाणच्या रस्त्यांची दुरूस्तीवर लक्ष देण्यात आले आहे. यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांच्या कामांच्या निविदांचे एस्टीमेटस् तयार करण्यात आले आहेत. हे एस्टीमेट तयार करताना रस्त्याची सद्यस्थिती तसेच पुढील काही वर्षात खोदाई होणार नसलेले रस्ते अशी वर्गवारी करून रस्त्यांच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. (Pune PMC News)

 

पहिल्या टप्प्यामध्ये रस्त्यांचे रिसरफेसिंग केले जाणार आहे. रस्ते रिसरफेसिंग करताना रस्ते समतल व पावसाचे पाणी कडेने जाईल असा स्लोप राहील याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात येणार आहे. तसेच ज्या रस्त्यांवर यापुर्वी सेवावाहीन्यांची कामे झाली आहेत व पुढे काही वर्षांपर्यंत या रस्त्यांवर खोदाईची गरज भासणार नाही असे रस्त्यांवर ६ इंच जाडीच्या कॉंक्रीटने नूतनीकरण करण्यात येणार आहेत. हे रस्ते पुढील १० ते १५ वर्षे खड्डेमुक्त राहातील, असा यामागील उद्देश असल्याचे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

मेट्रोचे (Pune Metro) काम करणार्‍या कंपन्यांनी अडथळे हटविण्यास सुरूवात
पोलिस आयुक्त (Pune CP), महामेट्रो (MahaMetro) आणि पीएमआरडीएच्या (PMRDA) अधिकार्‍यांसोबत मेट्रोची
कामे सुरू असलेल्या मार्गांवर तसेच उड्डाणपुलांच्या कामांची दोन दिवसांपुर्वी पाहाणी करण्यात आली.
त्यावेळी ज्याठिकाणी कामासाठी बॅरीकेडींग केल्याने रस्ता रुंदी कमी होउन वाहतूक कोंडी (Pune Traffic Jam) होते यावर उपाय सूचविण्यात आले होते.
त्यानुसार मेट्रो आणि पीएमआरडीएने काम सुरू केले आहे. अनेक ठिकाणचे बॅरीकेडस् आतील बाजूस घेउन रस्त्यांची वहनक्षमता वाढविण्यात आली आहे.
तसेच कामाच्या ठिकाणच्या रस्त्यांवर ज्याठिकाणी वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे,
अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | For road works in 23 villages included Soon the tender process will be implemented – Pune Municipal Corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांचे टोचले कान, नेत्यांना दिले ‘हे’ आदेश

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये पाऊस पडला ‘या’ प्रकारे जाहीर करण्यात येणार विजेता, आयसीसीचे नवीन नियम

Pune PMC News | पुणे मनपामध्ये करणार आणखी 200 हून अधिक पदांची भरती; आरोग्य आणि अग्निशामक दलामधील भरतीस प्राधान्य