Pune PMC News | पुणे महापालिका आयुक्तांची बनावट स्वाक्षरी करून ‘शिपाई’ पदावर नियुक्तीचे बनावट पत्र; महापालिका प्रशासन चक्रावून गेले

बोगस एजंटांवर तत्काळ गुन्हे दाखल करणार - रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिका आयुक्त व अन्य अधिकार्‍यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करुन एकाला ‘शिपाई’ पदासाठी नियुक्ती पत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बदल्यात संबधिताने तीन लाख रुपये घेतल्याचे निदर्शनास आल्याने अधिकारीही चक्रावून गेले आहेत. याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल (Pune Crime) करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade PMC) यांनी दिली. (Pune PMC News)

 

बिनवडे यांनी सांगितले, की आज सकाळी एक व्यक्ति शिपाई पदावर नियुक्ती झाल्याची ऑर्डर घेउन कार्यालयात आला. त्यावेळी त्याच्याकडील ऑर्डर बनावट (Fake Order Of Job In PMC) असल्याचे निदर्शनास आले. नियुक्तीपत्रावर मागीलवर्षाची तारीख आहे. या नियुक्तीपत्रावर तीन वर्षांपुर्वी महापालिकेतून बदलून गेलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह बिनवडे आणि सध्याचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar ) यांची बनावट स्वाक्षरी केल्याचे तत्काळ लक्षात आले. संबधितांकडे चौकशी केल्यावर गायकवाड नावाच्या व्यक्तीने या नोकरीसाठी संबधिताकडून ३ लाख रुपये त्याच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याची गंभीर दखल घेतली असून तातडीने गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. (Pune PMC News)

 

यापुर्वीही महापालिकेत नोकरीच्या अमिषाने (Lure Of Job In PMC Pune) तीन युवकांची सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. जानेवारी महिन्यांत उघडकीस आलेल्या या प्रकरणामध्ये महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका कर्मचार्‍याने अनुकंपा तत्वावरील वारसा हक्काने नोकर्‍या मिळवून देण्याचे अमिष दाखवून तीन युवकांकडून १० लाख रुपये घेतले. सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्या नावे कोथरूड क्षेत्रिय कार्यालयातील नियुक्तीपत्र दिली. परंतू या नियुक्ती पत्रांवरील मुठे यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. परंतू सहा महिने उलटले तरी याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. अशातच आज आणखी एक घटना उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

महापालिकेमध्ये पुढील महिन्यांत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होणार आहे.
यासाठी जाहिरात काढून एका एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेउनच पारदर्शकपणे भरती केली जाणार आहे.
युवकांनी खाजगी व्यक्तींच्या अमिषाला बळी पडून कुठलाही चुकीचा मार्ग अवलंबू नये.
बनावट नियुक्तीपत्राबाबत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आल्याने
याप्रकरणी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune PMC News | Forged letter of appointment for the post of peon with forged signature of Pune Municipal Commissioner; Municipal administration went round and round

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Casting Couch | ‘चित्रपटात काम करायचं असेल तर तुला चार दिवस या चार लोकांसोबत…’मराठी अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

 

Latur Crime |  धक्कादायक ! महिलेने 72 वर्षाच्या व्यक्तीसोबत बनवला अश्लिल व्हिडीओ, 15 लाखाचं ‘मॅटर’

 

Udayanraje Bhosale | ‘हिंमत असेल तर दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ या’, उदयनराजेंचे अजित पवारांना आव्हान