Pune PMC News | जी २० परिषदेची पुण्यात १६ व १७ जानेवारी रोजी बैठक ! पूर्व तयारीसाठी महापालिकेची युद्धपातळीवर तयारी

कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अगदी १०० ते १५० मीटर परिसरासाठी स्वतंत्र नोडल ऑफीसरची नेमणूक

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | जी २० परिषद तोंडावर आली असताना वेळेत कामे पुर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी परिषदेसाठी येणार्‍या पाहुण्यांच्या मार्गावरील सुशोभिकरण, रस्ते, पदपथ दुरूस्ती तसेच विद्युत विभागाच्या अगदी १०० ते १५० मीटर दरम्यानच्या कामांसाठी एक नोडल अधिकारी नेमला आहे. या परिषदेत नागरी सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे देखिल आयोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

जी २० या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने येत्या १६ आणि १७ जानेवारी दरम्यान पुणे शहरात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या नागरीकरणाचे शहरांवरील परिणाम या विषयावर या बैठकीमध्ये विविध देशांचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत. भारतात होणार्‍या पहिल्याच जी २० परिषदेसाठी केंद्र सरकारने देश पातळीवर जय्यत तयारी केली असून पुढील दोन वर्षांमध्ये देशातील विविध शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या बैठका व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरात येत्या १६ आणि १७ जानेवारी दरम्यान होणार्‍या बैठकीसाठी पुणे महापालिका व जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. (Pune PMC News)

लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील मेरियट हॉटेल दरम्यानचा मार्गावरील रस्ते, पदपथांची दुरूस्ती, चौक तसेच वाहतूक बेटांचे सुशोभिकरण, पथदिव्यांची दुरूस्ती, भिंतींची रंगरंगोटी अशी कामे महापालिकेच्यावतीने सुरू आहेत. ही कामे १० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काल संध्याकाळी या मार्गावरील कामांची पाहाणी केली. त्यावेळी विविध विभागांतील समन्वयाअभावी कामांना विलंब होत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्‍वभूमीवर अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरासाठी एक नोडल अधिकारी नेमून कामे गतीने पूर्ण करण्याची सूचना संबधित अधिकार्‍यांना दिल्याचे विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

यासोबतच महामेट्रो आणि पीएमआरडीए च्या अधिकार्‍यांसोबतही आज बैठक घेण्यात आली. मेट्रो मार्गावरील रस्ते, दुभाजक दुरूस्ती, पेटींग, बॅरीकेडसवर लोगो लावण्याची कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना संबधित अधिकार्‍यांना देण्यात आली. जी कामे शक्य नाहीत त्याबाबत उद्या संध्याकाळपर्यंत महापालिकेला कळवावे आम्ही ती पूर्ण करू, असेही त्यांना आश्‍वासित करण्यात आल्याचे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

 

जी २० परिषदेमध्ये नागरी सहभाग वाढविण्यासाठी परिषदेपुर्वी सायक्लोथॉन, वॉल्केथॉन, शहर स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये देखिल जनजागृती करण्यात येत असल्याचे कुमार यांनी सांगितले.

 

देशातील महापालिका आयुक्तांची परिषद
जी २० परिषदेपुर्वी राज्यातील व अन्य राज्यातील महापालिका आयुक्तांची परिषद आयोजित करण्याचे नियोजन करत आहोत.
या परिषदेमध्ये आपआपल्या शहरात आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक प्रकल्पांबाबत करण्यात
येणार्‍या विविध उपाययोजना व प्रयत्नांचे आदान प्रदान करण्याचा उद्देश आहे,
अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | G20 Council meeting in Pune on January 16 and 17! Preparation of municipal corporation on war level for pre-preparedness

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahavitaran Strike | राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा (व्हिडिओ)

Ajit Pawar on Nitesh Rane | टिल्ल्या लोकांनी मला शिकवू नये; अजित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा

IPS Deven Bharti | वरीष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बृहन्मुंबईच्या विशेष आयुक्तपदी नियुक्ती