Pune PMC News | पुणे शहराचा जाज्वल्य इतिहास सांगणारा ‘हेरिटेज वॉक’; पालिकेचा स्तुत्य उपक्रम

Pune PMC News | 'Heritage Walk' which tells the vivid history of Pune city; A commendable initiative by the municipality
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शहरातील विविध ऐतिहासिक ठेवा असलेली ठिकाणे व त्यांची माहिती नागरिकांना मिळावी या उदात्त हेतूने पुणे महानगरपालिकेने (Pune PMC News) हेरिटेज वॉक हा उपक्रम हाती घेतला आहे. हेरिटेज वॉक (Heritage Walk) या उपक्रमांतर्गत दर आठवड्याच्या रविवारी शनिवारवाडा ते विश्रामबाग वाडा अशी छोटीखानी सहल आयोजित केली जाते.

पालिकेच्या या हॅरिटेज वॉक उपक्रमात ११ ऐतिहासिक स्थळांना पायी चालत भेटी देऊन त्यांचा दैदिप्तमान इतिहास व महत्त्व गाईडद्वारे सांगितले जाते. गाईड सर्वांना त्या वास्तूचे वैशिष्ट्य व इतिहास समजावून सांगत असतात. सकाळी ७ वाजता शनिवार वाड्यातील दिल्ली दरवाज्यापासून (Delhi Gate) या पायी सहलीची सुरुवात होते. या हेरिटेज वॉक मध्ये शनिवारवाडा, लाल महाल (Lal Mahal), कसबा गणपती (Kasba Ganapati), पुणे नगर वाचन मंदिर (Pune Nagar Vachan Mandir), महात्मा फुले मंडई (Mahatma Phule Mandai) , भिडेवाडा (Bhidewada), विश्रामबागवाडा (Vishram Bagh Waada), श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Shrimant Dagdusheth Halwai), नाना वाडा (Nana wada), शिवाजी पूल (Shivaji Bridge), तुळशीबाग राम मंदिर (Tulshibagh Ram Temple), घोरपडे घाट (Ghorpade Ghat) अशा ११ ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या जाणार आहे. यावेळी त्यांचे महत्त्व तज्ज्ञाकडून सांगितले जाते.

 

पुणे शहराला त्याची एक सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख आहे. शहरामध्ये अनेक वास्तू आजही इतिहासाची ग्वाही
देत उभ्या आहेत. त्यांचे महत्त्व पुणेकरांसोबत इतर शहरांतील लोकांना तसेच परदेशी (Foreigner) पाहुण्यांना
कळावे म्हणून पालिकेनी (Pune PMC News) हा उपक्रम सुरु केला असून याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे. यासाठी पालिकेच्या साईटवर आधी रजिस्ट्रेशन (Registration) करणे गरजेचे आहे. पुणे पालिकेच्या https://heritagewalk.pmc.gov.in/ या लिंकवरून हॅरिटेज वॉकची संपूर्ण माहिती व रजिस्ट्रेशन करता येईल.

हेरिटेज वॉक तिकीट रुपये

भारतीय नागरिक – 300 /- रुपये

विद्यार्थी – 100 /- रुपये

परदेशी व्यक्ती – 500 /- रुपये

Web Title :  Pune PMC News | ‘Heritage Walk’ which tells the vivid history of Pune city; A commendable initiative by the municipality

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shubman Gill | शुभमन गील आणि सचिन तेंडूलकरचा हितगुज करताना फोटो व्हायरल; नेटिझन्सनच्या भन्नाट कमेंट्स

NCP Chief Sharad Pawar | ‘नव्या संसद भवनाची इमारत बांधताना…’ शरद पवारांचा गंभीर आरोप

Sambhajiraje Chhatrapati | स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार, संभाजीराजेंची मोठी घोषणा (व्हिडिओ)

Total
0
Shares
Related Posts