Pune PMC News | बेकायदा होर्डींग्ज उभारल्यास जागा मालकाच्या प्रॉपर्टीवर दंडाचा बोजा चढविणार, आकाशचिन्ह विभाग प्रमुख माधव जगताप यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शहरातील बेकायदा परंतू कायदेशीर होर्डींग नियमितीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून यासाठी आतापर्यंत २५० अर्ज दाखल झाले आहेत. परंतू जे होर्डींग नियमित होणार नाहीत, ते काढून टाकण्यात येणार आहेत. बेकायदा होर्डींग आढळल्यास संबधित जागा मालकावर अथवा सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरीच्या प्रॉपर्टी टॅक्सवर ५० हजार रुपयांच्या दंडाचा बोजा चढविण्यात येणार असल्याची माहिती आकाशचिन्ह आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap, PMC) यांनी दिली. (Pune PMC News)

 

शहरात मोठ्याप्रमाणावर बेकायदा होर्डींग (Illegal Hoarding) आहेत. मध्यंतरी होर्डींग्जचा वाद न्यायालयामध्ये असल्याने कारवाईवर मर्यादा येत होत्या. परंतू यापुढील काळात बेकायदा होर्डींग्जवर कारवाईसाठी महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) १० जणांचे पथक तयार केल्याची माहिती जगताप यांनी दिली. नियमित होउ शकणार्‍या होर्डींग्जला कायदेशीर मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत होर्डींग्जच्या परवानगीसाठी सुमारे २५० अर्ज आले आहेत. जागा पाहाणी व सर्व कागदपत्रांची तपासणी करूनच शुल्क आकारून होर्डींगला मान्यता देण्यात येणार आहे. (Pune PMC News)

यानंतरही बेकायदा होर्डींग आढळल्यास व ते उभारणारे न आढळल्यास होर्डींग ज्या जागेवर उभारले आहे,
त्या जागा मालकांना अथवा सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरीला ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
दंड भरण्यास नकार दिल्यास त्यांच्या प्रॉपर्टी टॅक्सवर बोजा चढविण्यात येणार असल्याचे जगताप यांनी नमूद केले.

 

Web Title :- Pune PMC News | If illegal hoardings are erected, fine will be levied on
the owner’s property, according to Madhav Jagtap, Head of Sky Signs Department.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा