Pune PMC News | पुणे मनपाच्या ८ शाळांना ISO मानांकन प्रमाणपत्र

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेला पुणे मनपा शिक्षण विभागाच्या ८ शाळांना ISO मानांकन प्रमाणपत्र महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे साहेब यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यावेळी शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत, डॉ. मनोरमा आवारे, प्रकल्प अधिकारी, समग्र शिक्षा, पुणे मनपा हे उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत यांनी पुणे मनपाच्या किमान २५ शाळा ISO करण्याचा संकल्प निश्चित केला असून त्यापैकी ८ शाळा ISO झाल्या असून उर्वरित १७ शाळांचे काम प्रगतीपथावर आहे. या साठी महापालिका आयुक्त मा. विक्रम कुमार, मा. महापालिका अतिरिक्त आयुक्त (जन.) मा. रविंद्र बिनवडे यांचे मार्गदर्शन लाभले. (Pune PMC News)

 

ISO मानांकन मिळविणाऱ्या शाळा

१) मनपा शाळा क्र. १०५ मुलांची , संदेशनगर
२) मनपा शाळा क्र. १०५ इंग्रजी , संदेशनगर
३)मनपा शाळा क्र. ६६ मुलींची , संदेशनगर
४) मनपा शाळा क्र. ८४ मुलींची , विश्रांतवाडी
५) मनपा शाळा क्र. १६४ मुलांची , धानोरी
६) मनपा शाळा क्र. २५ मुलींची , घोरपडेपेठ
७) मनपा शाळा क्र. १६२ मुलांची , चंद्रभागानगर
८) मनपा विद्या निकेतन क्र. १९ चंद्रभागानगर

 

Web Title :- Pune PMC News | ISO rating certificate for 8 schools of Pune Municipality

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा