Pune PMC News | सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकल्याप्रकरणी हडपसर क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने आज येथील प्रतिथयश बांधकाम व्यावसायीका विरोधात दंडात्मक कारवाई केली. या बांधकाम व्यावसायीकाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Pune PMC News)

शेवाळवाडी येथे जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रायव्हेट लि. या कंपनीचे बांधकाम सुरू आहे.
या बांधकामाच्या ठिकाणचा राडारोडा सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येत होता. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम आणि परिमंडळ चारचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संजय धनवट व विकास मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या बांधकाम व्यावसायीकाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि तो वसुलही केला. (Pune PMC News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chitra Wagh In Pune | महिला मोर्चाने सामान्य नागरिकांसाठी झटले पाहिजे – भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ

Sharad Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांवर शरद पवारांचा हल्लाबोल, ”तुमच्या घराचे किती मजले ED ने का ताब्यात घेतले यावर…”

Jitendra Awhad | बेरोजगारीच्या मुद्यावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक, ”बेरोजगार तरूणांनी उद्या कायदा हातात घेतला तर…”

NCP MLA Rajesh Tope | राजेश टोपे यांच्या कारवर हल्ला, एका राजकीय नेत्यावर आरोप करत नोंदवला निषेध

Journalist Sanjay Agarwal | ज्येष्ठ पत्रकार संजय अगरवाल यांची शिवसेना शिंदे गटाच्या प्रसार माध्यम व प्रसिद्धी विभाग समन्वयक पदी नियुक्ती