Pune PMC News | पुण्यात ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ मोहिम; नागरिकांना जुन्या वस्तू देण्याचे पालिकेचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | केंद्र सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ (Meri Life, Mera Swachh Sahar) या मोहिमेअंतर्गत पुनर्वापर (Recycling) होऊ शकणाऱ्या जुन्या वस्तूचे संकलन केले जात आहे. स्वच्छतेसाठी सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत पुणे महापालिकेने (Pune PMC News) शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १७ ठिकाणी केंद्रे तयार केले आहेत. ‘रिड्युस, रियुज व रिसायकल’ Reduce, Reuse and Recycle (आर.आर.आर.) या नावाने ही केंद्र ओळखली जाणार असून त्यामध्ये लोकांकडून जुन्या वस्तू घेतल्या जाणार आहे.

पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्था (Swachha Sanstha) यांच्या संयुक्त विद्यमाने ही ‘स्वच्छ भारत मिशन २.०’ (Swachh Bharat Mission 2.0) अंतर्गत ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ ही मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत ‘आर.आर.आर.’नुसार पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू स्विकारल्या जाणार आहेत. त्यामध्ये लोकांच्या वापरात नसलेल्या जुन्या वस्तू घेतल्या जाणार आहे. यामध्ये जुनी पुस्तके, पेपर, मॅगझीन, कार्डबोर्ड, प्लॅस्टिक, थर्माकोल, फर्निचर, काच, काचेच्या बाटल्या, भांडी, ई कचरा, जुनी कपडे, पादत्राणे यासह इतर वस्तूंचा स्वीकार केला जाणार आहे. यामध्ये ट्युबलाईट, बल्ब, बांधकामाचा राडारोडा, बाथरुममधील जुने नळ अशा पुन:वापर न होऊ शकणाऱ्या वस्तू स्विकारल्या जाणार नाहीत.

 

 

पर्यावरणपुरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याऱ्या या केंद्र सरकारच्या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १७ विविध ठिकाणी ‘आर.आर.आर.’ केंद्रें तयार करण्यात आली आहे. यामध्ये विविध सोसायट्या, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स , (Shopping Complexes), मोकळी मैदाने, बाजारपेठा यांचा समावेश आहे. याठिकाणी मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आपल्याकडील जुन्या वस्तू देता येणार आहे.

आतापर्यंत या मोहिमेमध्ये बाराशेहून अधिक नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला आहे. शहरातील नागरिकांनी आत्तापर्यंत २७ टन जुन्या वस्तू देऊन टाकल्या आहेत. या जुन्या वस्तूंमध्ये कपड्यांचे प्रमाण सर्वाधिक असून आत्तापर्यंत ५६ टक्के जुने कपडे जमा झाले आहे. यामध्ये २७ टक्के खेळणी, पादत्राणे, भांडी, शोभेच्या वस्तू, बॅग्स यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये ८ टक्के ई वेस्ट (E – Waste), तर ९ टक्के पुस्तके (Books) जमा झाली आहेत.

या ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ अंतर्गत जमा झालेल्या वस्तूंचे संकलन करून त्यांचे नूतनीकरण करणे (Refurbishment), नवीन उत्पादन करणे (Remanufacturing) किंवा पुनर्वापर असा सदुपयोग करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होणार आहे. (Pune PMC News)

क्षेत्रीय कार्यालय ‘आर.आर.आर.’ केंद्रांची नावे

१) वडगाव शेरी – फॉरेस्ट काऊंटी सोसायटीजवळ, डॉ. हेडगेवार क्रीडांगण, कल्याणीनगर

२) येरवडा, कळस, धानोरी – रोड नं १०, डी, विद्यानगर

३) ढोले पाटील रोड – बर्निंग आरोग्य कोठी

४) औंध बाणेर – जुने औंध क्षेत्रीय कार्यालय

५) शिवाजीनगर घोले रोड – हिरवाई हजेरी कोठी, कमला नेहरू पार्क

६) कोथरूड-बावधन – मयूर कॉलनी आरोग्य कोठी

७) धनकवडी – सहकारनगर – तीन हत्ती चौक हजेरी कोठी, शरदचंद्र पवार उद्योग भवन

८) सिंहगड रोड – सनसिटी आरोग्य कोठी

९) वारजे कर्वेनगर – नादब्रम्ह आरोग्य कोठी

१०) हडपसर मुंढवा – मगरपट्टा चौक, मेगा सेंटरजवळ

११) कोंढवा येवलेवाडी – पेशवे तलाव कोठीजवळ

१२) वानवडी रामटेकडी – शिवरकर उद्यान, वानवडी

१३) कसबा विश्रामबागवाडा – इंद्रधनुष्य

१४) भवानी पेठ – मनपा कॉलनी नं.८, घोरपडी पेठ

१५) बिबवेवाडी – व्हिआयटी आरोग्य कोठी, अप्पर

Web Title :  Pune PMC News | ‘Merry Life, Mera Swachh Shahr’ campaign in Pune; Appeal of the municipality to give old things to the citizens

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा नितेश राणेंवर ‘प्रहार’

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर देखील पैशासाठी तगादा लावणार्‍या सूरज म्हेत्रेविरूध्द खंडणीचा गुन्हा