Pune PMC News | G20 साठी CSR मधून रस्ता दुभाजकावर केलेल्या सुशोभिकरणावर मेट्रो, महापालिका प्रशासनचा ‘राडारोडा ’

दुभाजकावरील राडारोडा तातडीने हटवावा शिवसेनेचे पदाधिकारी प्रशांत बधे यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | जानेवारीमध्ये झालेल्या जी २० आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी महापालिकेने CSR च्या माध्यमातून शहरातील व्यावसायीकांकडून विविध चौक आणि वाहतूक बेटे सुशोभिकरणाची कामे करून घेतली आहेत. परंतू अनेक ठिकाणी नागरिकांकडून त्यावर थुंकूण आणि कचरा टाकून विद्रुपीकरण केले आहे. परंतू या विद्रुपीकरणास प्रशासनाने देखिल तेवढाच हातभार लावल्याचे पाहायला मिळत आहे. (Pune PMC News)

जी २० परिषदेच्या निमित्ताने महापालिका प्रशासनाने (PMC Administration) जानेवारीमध्ये शहरातील ५० हून अधिक चौकांमध्ये सुशोभीकरण केले. ही कामे प्रामुख्याने शहरातील उद्योजक आणि व्यावसायीकांकडून सीएसआरच्या माध्यमातून करून घेतली आहेत. तर उर्वरीत कामे ही महापालिका आणि केंद्र सरकारकडून जी २० परिषदेसाठी मिळालेल्या निधीतून करण्यात आली आहेत. परंतू अनेक रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे आणि उड्डाणपुलांच्या रंगवलेल्या भिंतींवर वाहनचालकांनी गुटख्यांचे फवारे तसेच कचरा टाकून विद्रुपीकरण केले आहे. यानंतरही नुकतेच झालेल्या परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने गुटख्यांमुळे झालेले विद्रुपीकरण ‘धुवून’ काढले आहे. (Pune PMC News)

परंतू या विद्रुपीकरणात महापालिका आणि मेट्रो प्रशासनानेही (Pune Metro) तितकाच हातभार लावल्याचे पाहायला मिळत आहे. याचे मासलेवाईक उदाहरण कर्वे रस्त्यावर पाहायला मिळत आहे. बांधकाम व्यावसायिक पंडित जावडेकर यांनी लाखो रूपये खर्च करून विमलबाई गरवारे प्रशालेपासून रसशाळे पर्यंत व तिथून पुढे नळस्टॉप पर्यंत रस्त्याच्या डिव्हायडरमधे माती टाकून फ्लॉवर बेड तयार करून दिला आहे. त्यात विविध प्रकारची फुल झाडे लावण्यात आली होती. परंतू आता त्या फ्लॉवर बेडमध्ये अपवादानेच झाडे दिसत असून रस्त्यावरील काढलेली झाकणे आणि राडारोडा टाकून डिव्हायडरमधील फ्लॉवर बेडस् भरून टाकली आहेत. याकडे मेट्रो, पथ विभाग आणि उद्यान विभागाचे देखिल लक्ष नसल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासन असे दुर्लक्ष करत असेल तर भविष्यात कुठलाही व्यावसायीक महापालिकेला सहकार्य करण्यासाठी पुढे येणार नाही. प्रशासनाने तातडीने हा राडारोडा काढून फ्लॉवर बेड पुर्ववत करावे, अशी मागणी शिवसेनेचे Shivsena UBT (उद्धव ठाकरे) पदाधिकारी प्रशांत बधे (Prashant Badhe) यांनी केली आहे.

Web Title :   Pune PMC News | Metro, municipal administration’s ‘Radaroda’ on beautification at road junction from CSR for G20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा