Pune PMC News | पुणे मनपामध्ये करणार आणखी 200 हून अधिक पदांची भरती; आरोग्य आणि अग्निशामक दलामधील भरतीस प्राधान्य

महिनाअखेरपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करणार – विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त व प्रशासक

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | नोकरभरती मध्ये आघाडी घेणारी पुणे महापालिकेमध्ये (Jobs In PMC Pune) लवकरच आरोग्य (PMC Health Dept), अग्निशामक दल (Fire Brigade PMC Dept)व अन्य विभागातील विविध संवर्गातील पदांची भरती होणार आहे. येत्या आठवड्याभरात खातेनिहाय पदसंख्या निश्‍चित करून जाहीरात काढली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

पुणे महापालिकेने नुकतेच ४५० पदांची भरती केली आहे. महापालिकेच्या आकृतीबंधाला मान्यतेसाठी बराच विलंब लागल्याने गेल्या अनेक वर्षात अभियंते वगळता अन्य विभागांमध्ये भरतीच झालेली नव्हती. त्यामुळे सुमारे १८ हजार कर्मचारी असलेल्या पुणे महापालिकेमध्ये अनेक पदे रिक्त आहेच. कंत्राटी पद्धतीने अनेक पदे भरून महापालिकेचा कारभार सुरू आहे. कोरोनासारख्या महासाथीच्या दोन अडीच वर्षांच्या कालावधीत या रिक्तपदांमुळे महापालिकेला ठेकेदारी पद्धतीच्या कर्मचार्‍यांवरच अवलंबून राहावे लागले आहे. तसेच शहरात आगी व अन्य गंभीर घटना घडत असताना मोजक्या शिलेदारांवरच महापालिकेची भिस्त आहे. प्रामुख्याने आरोग्य व अग्निशामक दलासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये देखिल मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने नागरिकांना सुविधा देण्यात तसेच महापालिकेची रुग्णालये आणि अग्निशामक केंद्र धूळखात पडली आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने नोकरभरतीसाठी उचललेले पाउल आश्‍वासक ठरणारे असून रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना देखिल यामुळे संधी उपलब्ध होणार आहेत. (Pune PMC News)

यासंदर्भात माहिती देताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी सांगितले, की राज्यात दीर्घ कालावधीनंतर महापालिकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे महापालिकेने यामध्ये आघाडी घेतली आहे. नुकतेच इंजिनिअर्स, अतिक्रमण निरीक्षक, विधी सहाय्यक आणि लिपिक अशी सुमारे ४५० पदांची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली आहे. या पदांवरील उमेदवार लवकरच सेवेत रूजू होतील. पुढील टप्प्यामध्ये २०० हून अधिक पदांची भरती केली जाणार असून पुढील आठवड्यात या पदभरतीला मान्यता देण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य आणि अग्निशामक दलातील भरतीला प्राधान्य देण्यात येईल. ही भरती प्रक्रिया देखिल पारदर्शकपणे आणि त्याच पद्धतीने होईल. पदांची आकडेवारी आणि जाहिरात नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येईल. अभियंत्यांच्या कार्यकारी पदावरील काही जागांची देखिल प्रथमच भरती केली जाणार असून यामुळे अनुभवी अभियंते मिळतील.

 

३४ गावांच्या समावेशामुळे आकृतीबंधातील जागा वाढविण्यात येणार
महापालिकेमध्ये ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. लोकसंख्येत वाढ झाल्याने २००७ मध्ये तयार केलेल्या आकृतीबंधातील जागांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
प्रामुख्याने अभियंता वर्गाच्या जागांमध्ये वाढ करण्यात येईल. महापालिकेकडे सध्या ८०० हून अधिक अभियंते आहेत.
महापालिकेचे सध्याचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विचार करून यामध्ये साधारण २२ ते २५ टक्के पदांची वाढ होईल.
यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेउन आकृतीबंधाचा आढावा घेउन प्रस्ताव तयार करण्यात येईल.
या प्रस्तावाला मान्यता देउन राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | More than 200 more posts will be recruited in Pune Municipal Corporation; Preference for recruitment in health and fire service

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anushka Shetty | अनुष्का शेट्टीने दिले ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम ; म्हणाली ‘प्रभास हा माझा…’

Pune Crime | हडपसर परिसरातील कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 20 जणांवर कारवाई

Abdul Sattar | टीकेनंतर अब्दुल सत्तार आपल्या वक्तव्यावर ठाम, सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना म्हणाले-‘मग त्यांना…’