Pune PMC News | येवलेवाडीतील बेकायदा बांधकामांवर महापालिकेची कारवाई; बेकायदा प्लॉटींग आणि बांधकामांना नोटीसा

पुणे – Pune PMC News | येवलेवाडी येथे करण्यात आलेल्या अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामांची महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे (Yewalewadi Illegal Construction News). येथील बेकायदा बांधकामांना नोटीसेस देण्यात आल्या असून मागील काही दिवसांत सुमारे ४० हजार चौ.फूट बेकायदा बांधकामे पाडली आहेत. ही कारवाई यापुढेही सुरू राहील अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh PMC) यांनी दिली.

काही वर्षांपुर्वी महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या येवलेवाडी गावच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे आहेत.
अगदी डोंगर कापून तसेच ओढे, नाल्यांवर भराव टाकून बेकायदा प्लॉटींग सुरू आहे.
यामुळे या परिसरात भविष्यात मोठ्याप्रमाणावर नागरी समस्या निर्माण होणार असल्याबाबत ‘पोलीसनामा ऑनलाइन’ने सातत्याने प्रकाश टाकला आहे.
महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. (Pune PMC News) येवलेवाडी परिसरातील बेकायदा प्लॉटींग करणार्‍यांना नोटीसेस पाठविण्यास सुरूवात केली आहे.
तसेच बेकायदा बांधकामे पाडून टाकण्यात येत आहेत. नुकतेच ४० हजार चौ. फूट बांधकाम पाडण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.

Web Title :- Pune PMC News | Municipal Corporation Action on Illegal Constructions in Yevlewadi; Notice of illegal plotting and construction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics Crisis | निवडणूक आयोग शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवू शकतं, त्यामुळे आगामी निवडणुकीत…, माजी निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं

Dasara Melava 2022 | शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेंचे भाषण होणार?, शिंदे गटाच्या मंत्र्याने स्पष्टच सांगितलं