Pune PMC News | महापालिकेच्या सेवा- सुविधा आता ‘व्हॉटस् ऍप चॅटबॉटवर’ सुरू ; पहिल्या टप्प्यातील मिळकत कर सेवेस प्रारंभ

 मो. क्र. ८८८८२५१००१ सेव्ह करा आणि सेवेचा लाभ घ्या : रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | संदेश वहनासाठी सर्वाधीक लोकप्रिय ठरलेल्या मोबाईलवरील ‘व्हॉट्सॲपचा’ महापालिकेने नागरी सुविधांसाठी वापर करण्यास सुरूवात केली आहे. सेवा हमी कायद्यानुसार द्याव्या लागणार्‍या सेवा पुणेकर नागरीकांना २४ तास आणि वर्षातील ३६५ दिवस जगभरात कुठूनही मिळाव्यात यासाठी मोबाईल क्र. ८८८८२५१००१ वर ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ (WhatsApp Chatbot) ही सुविधा सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात व्हॉट्सॲपवर या क्रमांकावर केवळ ही अक्षरे टाईप केल्यानंतर मिळकतधारकांना मिळकत कराच्या (Property Tax) पावतीपासून, थकबाकी (Outstanding), एनओसी (NOC) तर मिळेलच परंतू यावरील लिंकवरून सुरक्षितरित्या मिळकत कर भरणाही करता येणार आहे. अशी सुविधा देणारी देशातील बहुतांश पहिली महापालिका असल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Addl Commissioner Ravindra Binawade) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune PMC News)

 

बिनवडे यांनी सांगितले, की महापालिकेच्यावतीने (Pune PMC News) नागरिकांना विविध सुविधा देण्यात येतात. परंतू तंत्रज्ञान विकसित होण्यापुर्वी नागरिकांना प्रत्येक कामासाठी महापालिकेच्या कार्यालयांत जावे लागत. ई गर्व्हनन्स सुरू झाल्यानंतर महापालिकेने विविध सेवा ऑनलाईन सुरू केल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासाच्या पुढील टप्प्यात जवळपास प्रत्येक नागरिक मोबाईल वर वापरत असलेल्या ‘व्हॉटस् ऍप’बॉटचा उपयोग करून नागरिकांना अधिक जलदगतीने आणि अगदी जगात कोठेही बसून महापालिकेशी संबधित सेवा, सुविधा एका क्लिक करून मिळू शकणार आहेत.

 

यासाठी महापालिकेने व्हॉटस् ऍपकडून ८८८८२५१००१ हा विशेष क्रमांक घेतला आहे. नागरिकांनी मोबाईलमध्ये हा क्रमांक सेव्ह केल्यानंतर केवळ हा शब्द टाईप केल्यानंतर पुढील संवाद सुरू होणार आहे. या व्हॉटस् ऍप बॉटवरून नागरिकांना पहिल्या टप्प्यात मिळकत क्रमांक टाईप केल्यानंतर कराची देय रक्कम, कर भरलेली रक्कम, कराची पावती, थकबाकी नसल्यास एनओसी मिळू शकणार आहे. मिळकत कराची रक्कम ऑनलाईन भरायची असल्यास लिंकही मिळणार आहे. मिळकत क्रमांकाशी (प्रॉपर्टी आयडी) मोबाईल क्रमांक आणि इ मेल आयडी देखिल लिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच अंदाजे मिळकत कर मोजणे तसेच नवीन मिळकत अथवा अतिरिक्त बांधकामासाठीसाठी स्व मुल्यांकनाचीही सुविधा या व्हॉटस् अपॅ चॅटबॉटवर मिळणार आहे. (Pune PMC News)

पुढील टप्प्यात पाणी पट्टी, जन्म मृत्यू दाखले, पाळीव प्राण्यांची नोंदणी, बांधकाम प्रस्ताव दाखल करणे,
यासारख्या दैनंदीन निगडीत गरजांसोबतच तक्रार नोंदणीची सुविधा याच व्हॉटस् ऍप चॅटबॉटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या व्हॉटस् ऍप बॉटमुळे नागरिकांची वेळेची आणि पैशांची बचत होणार असून अडथळे कमी
होउन पेपरलेस काम करण्याच्या दिशेने मोठा उपयोग होईल,
असा दावाही बिनवडे यांनी केला आहे. याप्रसंगी महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख उपायुक्त प्रतिभा पाटील,
राहुल जगताप, मिळकत कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे- धुमाळ (Assistant Commissioner Asmita Tambe-Dhumal) या उपस्थित होत्या.

 

Web Title :- Pune PMC News | Municipal services-facilities are now available on ‘Whats App Chatbot’; Commencement of First Phase Income Tax Service

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits of Pomegranate | ’डाळिंब’ आरोग्यासाठी ब्रम्हास्त्र, रोज करा सेवन; हृदय मधुमेह आणि सूजसंबंधी आजारांत मिळेल दिलासा

 

Men’s Health | दीर्घकाळ आरोग्य कायम राखण्यासाठी ‘ही’ आहेत 5 पोषकतत्व, डाएटमध्ये ताबडतोब करा समावेश

 

Pune Pimpri Crime | निलंबित पोलीस असल्याचे सांगत PG मालकाला मारहाण, हिंजवडी परिसरातील घटना