Pune PMC News | वादग्रस्त नदीसुधारणा प्रकल्पाची कामे G-20 परिषदेतील पाहुण्यांना दाखवण्यासाठी पालिकेची पळापळा सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | यापूर्वी झालेल्या G – 20 परिषदेवेळी शहराला कोट्यावधी रुपयांची रंगरंगोटी पालिकेने करुन पुणे शहराचे नवे रुपडे परदेशी पाहुण्यांना दाखवले. त्यानंतर आता पुन्हा एकदा जूनमध्ये G-20 च्या दोन बैठका पुण्यात होत असल्याने पालिकची (Pune PMC News) चिंता वाढली आहे. या बैठकीस येणाऱ्या 20 देशांच्या प्रतिनिधींना मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेंतर्गत बनवण्यात आलेला नदीसुधारणा प्रकल्प (Mula-Mutha River Front Development) दाखवण्याचा घाट पालिका घालत आहे.

जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा G – 20 च्या इलेक्ट्रॉनिक्स गटाची (Electronics Group) व शिक्षणविषयक गटाची (Educational Group) ची बैठक पार पडणार आहे. नेमकी आषाढी पालखी (Ashadhi Wari) सोहळ्याच्या वेळी असणाऱ्या या बैठकांमुळे पालिकेची आधीच धांदल उडाली आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर आक्षेप असलेला वादग्रस्त नदीसुधारणा प्रकल्पाची कामे पुण्यात आलेल्या परदेशी पाहुण्यांना दाखविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांबाबत मोठ्या प्रमाणावर आक्षेप असल्याने योजनेतील कामेही वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये संगमवाडी ते बंडगार्डन (येरवडा) (Sangamwadi to Bundagarden) नदीकाठचे सुशोभीकरण करण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. नदीकाठचे सुशोभीकरण करून, नदीकाठी सायकल मार्ग (Cycle Track) आणि नाईक बेटाला नवीन रूप देण्यात आले आहे. कोरेगाव पार्क Koregaon Park (KP) , धोबी घाट (Dhobi Ghat) आणि बोट क्लब रस्ता (Boat Club Road) येथे बंधारा टाकण्यात आला असून, खडी टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे. महापालिका प्रशासनाने साडेचार हजार कोटी रुपये खर्च करून या योजनेंतर्गत कामे सुरू केली आहेत. (Pune PMC News)

 

योजनेअंतर्गत नदीकाठच्या परिसरातील सहा हजारांहून अधिक झाडे तोडण्यात येणार असून
नदीकाठीच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम होणार आहे.
यामुळे नदीची वहन क्षमता कमी होणार असून,
पुराचा धोका निर्माण होणार असल्याचा आक्षेप शहरातील पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.
योजनेअंतर्गत ८० टक्के काँक्रिटीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.
यामुळे नदीचा प्रवाह विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
नदीचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व साहित्य हटविण्यात यावे,
अशी सूचना संबंधित ठेकेदाराला महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

 

Web Title :  Pune PMC News | Municipality rushes to show off controversial river improvement project to G-20 summit guests

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा