Pune PMC News | 34 गावांमधील ड्रेनेज लाईन व पावसाळी गटारांसाठी दीड हजार कोटी रुपये खर्च ! सल्लागाराकडून प्राथमिक अहवाल मिळाला – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांत मैला – सांडपाणी आणि पावसाळी गटारे निर्माण करण्यासाठी सुमारे पंधराशे कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल सल्लागार संस्थेने महापालिकेला दिला आहे. यासंदर्भात जायका सोबतही चर्चा सुरु असल्याची माहीती आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांतील नागरी सुविंधाविषयी सातत्याने प्रशासनावर टिका केली जात आहे. तसेच स्मार्टसिटी कंपनीने या गावांत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास कामे केली जावी अशी भुमिका घेतली आहे. यापार्श्वभुमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना विचारले असता, ते म्हणाले, बावधन येथील पाणी पुरवठा योजना, सुस – म्हाळूंगे पाणी पुरवठा योजना, वाघोली – मांजरी पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यात येत आहे. तसेच समाविष्ठ गावांत सांडपाणी – मैला पाणी वाहीन्या टाकणे, मैला – सांडपाणी प्रक्रीया केंद्र उभारणे यासाठी सल्लागार नियुक्त केला होता. या सल्लागाराने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार साधारणपणे अकराशे कोटी रुपयांचा निधी त्यासाठी आवश्यक आहे. (Pune PMC News)

तसेच पावसाळी गटारे निर्माण करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार असुन,
त्याकरीता साधारणपणे चारशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
यापुर्वी महापालिकेच्या हद्दीत समाविष्ठ झालेली अकरा गावे आणि त्यानंतर समाविष्ठ झालेली तेवीस गावे
या भागातुन पीएमआरडीएने बांधकाम विकसन शुल्क वसुल केले आहे.
ही सुमारे पाचशे कोटी रुपयांची रक्कम महापालिकेला या भागातील विकास कामांसाठी मिळाली पाहीजे
ही महापालिकेची भुमिका असुन, त्यानुसार राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune PMC News | One and a half thousand crore rupees spent for drainage lines and rain sewers in 34 villages! Preliminary report received from consultant – Vikram Kumar, Municipal Commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Devendra Fadnavis | सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून विधान, म्हणाल्या – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’

Pune Rural Police | अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडले महागात, पोलिसांकडून पालकांवर खटले दाखल

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…