Pune PMC News-PM Modi Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वच्छ अमृत महोत्सवाअंतर्गत इंडियन स्वच्छ लिगमध्ये पुणे महापालिकेची ‘पुणेरी नायक’ टीम सहभागी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune PMC News-PM Modi Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (१७ सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) दरम्यान आयोजित स्वच्छ अमृत महोत्सवाअंतर्गत ‘इंडियन स्वच्छ लिग’मध्ये पुणे महापालिका ‘पुणेरी नायक’ या नावाने सहभागी झाली आहे. पुणे महापालिका शहरातील विविध स्वंयसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबरला स्वच्छतेच्या मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Dr Kunal Khemnar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune PMC News-PM Modi Birthday)

 

याप्रसंगी घनकचरा विभागाच्या प्रमुख्य उपायुक्त आशा राउत (Asha Raut PMC) तसेच विविध स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तळजाई टेकडी, कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलाव आणि नारायण पेठ येथील मुठा नदीकाठच्या ओंकारेश्‍वर घाट येथे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात येणार्‍या रॅलीमध्ये शहरातील सर्व क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती, स्वच्छता करणे, प्लास्टिक कचरा गोळा करणे असे उपक्रम होणार आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत होणार्‍या या रॅलीचा समारोप शनिवार वाडा येथे होणार आहे.

या अभियानामध्ये माजी नगरसेवक, पदाधिकारी, शाळा व महाविद्यालये, एनएसएस, एनसीसी, खाजगी संस्था,
स्वंयसेवी संस्था, महिला बचतगट, गणेश मंडळे, मोहल्ला कमिटी सदस्य व प्रतिष्ठीत नागरीकांनी सहभागी व्हावे असे
आवाहन बिनवडे आणि राउत यांनी केले आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/register/ या लिंकवर नोंदणी करावी.

 

Web Title :- Pune PMC News-PM Modi Birthday | The ‘Puneri Nayak’ team of Pune Municipal Corporation participated in the Indian Swachh League as part of the Swachh Amrit Mahotsav organized on the occasion of Prime Minister Narendra Modi’s birthday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Box Office Record | रणबीर-आलियाच्या Brahmastra च्या समोर फेल झाला अल्लू अर्जुनचा Pushpa, बॉलीवुडचाच डंका

Uric Acid | महिलांमध्ये किती असावे यूरिक अ‍ॅसिड? पहा कंट्रोल करण्यासाठी चार्ट

Diet Tips For Uric Acid | सर्वात बेस्ट आहे ‘या’ पीठाची भाकरी, ताबडतोब कमी होईल यूरिक अ‍ॅसिड, सांधेदुखीसुद्धा होईल दूर