Pune PMC News | पुण्याच्या शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ मोहीम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक बळकट व्हावी व त्यांची जनजागृती व्हावी या उद्देशाने पुणे महानगरपालिका (Pune PMC News) व पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबोरेटिव्ह रिस्पॉन्स Pune Platform for Collaborative Response (पीपीसीआर-PPCR) यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन मोहिम आखण्यात आली आहे. कसबा-विश्रामबागवाडा परिसरात शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ (Majhe Pune, Swachh Pune) अशी मोहीम सुरू करण्यात आली असून यामध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रणाली (Solid Waste Management System) तयार करून त्याबद्दल अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहचवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत नागरिकांना कचरा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण व त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा मानस आहे. (Pune PMC News)

जनवाणी आणि सोशल लॅब (Janwani and Social Lab) यांच्यातर्फे पुढचे एक वर्ष ही मोहीम राबवली जाणार असून यामध्ये कचऱ्याचे संकलन करणे, त्याचे वर्गीकरण करणे व हे कचऱ्याचे ढीग नाहीसे करणे अशी कामे केली जाणार आहेत. मोहिमेच्या माध्यमातून सुमारे ८५ हजार निवासस्थाने, २३ हजार व्यावसायिक आस्थापने आणि १२ हजार झोपडपट्टी लोकवस्ती अशा एकूण २.८ लाखांहून अधिक नागरिकांना या मोहिमेचा फायदा होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

नुकतेच केसरीवाडा येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (Kunal Khemnar), घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत (Asha Raut) , पीपीसीआरचे डॉ. सुधीर मेहता (Dr. Sudhir Mehta), श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सुर्यवंशी (Mahesh Suryawanshi) आणि स्वच्छ भारत मिशनसाठी सदिच्छादूत डॉ. सलील कुलकर्णी (Dr. Salil Kulkarni), ऋतुजा भोसले (Rutuja Bhosale) आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

या मोहिमेवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, “शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन आणि विलगीकरण,
कचऱ्याचे ढीग नाहीसे करणे, कचऱ्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करणे, वस्तुंच्या पुनर्वापराविषयी जागृती करणे
ही मोहीमेची उदिष्ट्ये असणार आहेत”. पीपीसीआरचे आशिष भंडारींनी मोहिमेविषयी माहिती देताना सांगितले की,
“शहरातील कॉर्पोरेट कंपन्या, अशासकीय संस्था, स्वयंसेवी गट आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र
येऊन स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती करण्याचा हा एक वेगळा उपक्रम आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून शाश्वत कचरा व्यवस्थापन (Waste Management) होऊन पर्यावरणाचा समतोल
राखण्यासाठी मदत होईल. तसेच स्वच्छ पुण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा उपक्रम इतर प्रभागांसाठी एक
आदर्श प्रकल्प ठरेल”, असा विश्वास आशिष भंडारी यांनी व्यक्त केला आहे. (Pune PMC News)

Web Title : Pune PMC News | pmc and ppcr joins hands for majhe pune swachh pune campaign

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | ‘दंगल करणारा हिंदू असो वा मुस्लीम, त्यांचे हात छाटले पाहिजे’, आमदार बच्चू कडूंचं मोठं विधान

Tulja Bhavani Temple News | तुळजाभवानीच्या दर्शनासाठी ड्रेसकोड, मंदिर परिसरात झळकले फलक; अचानक घेतलेल्या निर्णयामुळे भाविकांची गैरसोय

Pune Ahmednagar Highway | पुणे- अहमदनगर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश