Pune PMC News | पुणे महानगरपालिका : तुमच्या भागातील नाले सफाईची कामे झाली नसतील तर ‘या’ 2 नंबर वर WhatsApp करा, जाणून घ्या नंबर

मान्सूनपुर्व साफ-सफाई करण्याचे काम पुणे महापालिकेच्या मलःनिस्सारण विभागाकडून सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | आपल्या परिसरातील नाले सफाई (Drainage Cleaning), पावसाळी लाईन / चेंबर (Sewer Lines) इत्यादींची कामे झालेली नसतील किंवा करावयाची शिल्लक असल्यास अशा ठिकाणांची कामे पूर्ण होण्याकरिता या ठिकाणांची माहिती फोटो, जीपीएस लोकेशनसह (GPS Location) पुणे महानगरपालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) उप आयुक्त महेश पाटील PMC Deputy Commissioner Mahesh Patil (आपत्ती व्यवस्थापन विभाग – Department of Disaster Management PMC) यांना 9689930531 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (वर्ग-1) गणेश सोनुने (Ganesh Sonune PMC) यांना 9689935462 या मोबाईल नंबरवर पाठवा असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे प्रशासन तथा आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी केले आहे. (Pune PMC News)

 

पुणे महानगरपालिका क्षेत्रात मान्सूनपुर्व तयारीचा भाग म्हणून पुणे मनपा हद्दीतून वाहणारे विविध नैसर्गिक प्रवाह / नाले व ओढे, मलःनिस्सारण वाहिन्या, पावसाळी लाईन व चेंबर्स इत्यादी मान्सूनपुर्व साफ-सफाई करण्याचे काम पुणे महापालिकेच्या मलःनिस्सारण विभागाकडून सुरू आहे. पुणे शहरात एकूण 433 नाले असून त्यांची लांबी 625 किलोमीटर इतकी आहे. पावसाळी लाईन 260 किलोमीटर असून 58 हजार 859 पावसाळी चेंबरची संख्या आहे. सदरील नाले सफाई व पावसाळी लाईन/चेंबर मान्सूनपुर्व कामकाज दि. 5 जून 2023 अखेर पुर्ण होणे अपेक्षित आहेत. त्यापार्श्वभुमीवर पुणे महापालिककडून आवाहन करण्यात आले आहे. (Pune PMC News)

महानगरपालिकेकडून देण्यात आलेले मोबाईल नंबर हे मान्सूनपुर्व व आपत्ती व्यवस्थान कामकाजाकरिता
स्वतंत्रपणे वापरण्यात येणार आहेत. ज्यामुळे प्राप्त तक्रारींचे निरसन करणे शक्य होणार आहे.

 

Web Title :  Pune PMC News | PMC Give WhatsApp Number For Drainage Cleaning Sewer Lines
IAS Vikram Kumar Mahesh Patil Ganesh Sonune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा