Pune PMC News | शहरातील 7 वाहनतळाच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरी; पालिकेला दरवर्षी मिळणार सुमारे अडीच कोटी रुपये उत्पन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेच्या मालकिची शहराच्या विविध भागातील ७ वाहनतळ (PMC Parking Lot) अर्थात पार्किंग चालविण्यास देण्याच्या निविदा (PMC Parking Lot Tender) महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये (PMC Standing Committee Meeting) मंजुर करण्यात आल्या आहेत. तीन वर्षांसाठी या निविदा काढल्या असून महापालिकेला दरवर्षी सुमारे अडीच कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. (Pune PMC News)

 

महापालिकेने शहरात विविध भागात पार्किंग उभारले आहेत. या ठिकाणी ‘पे ऍन्ड पार्क’ ची (Pay And Park) अंमलबजावणी करण्यात येत असून खाजगी संस्थांच्या माध्यमातून या पार्किंगची संचलन करण्यात येते. प्रशासनाने शहरातील सात पार्किंगच्या निविदा मागविल्या होत्या. जवळपास सर्वच निविदा अधिक दराने आल्या असून सर्वाधीक दर देणार्‍या ठेकेदारांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पुणे स्टेशन येथील कै. तुकारामशेठ शिंदे वाहनतळ येथील दुचाकी आणि चारचाकी वाहनतळाची स्वतंत्र निविदा मागविण्यात आली होती. दुचाकीसाठीची १ कोटी ८ लाख रुपयांची मे. शारदा सर्व्हिसेसची निविदा मंजुर करण्यात आली. तर चार चाकी वाहनतळाची मे. डि. आर. सर्व्हिसेस या संस्थेची ८१ लाख रुपयांची निविदा मंजुर करण्यात आली. (Pune PMC News)

गणेश पेठेतील अल्पना सिनेमा समोरील वाहनतळाची ४ लाख १० हजार रुपयांची अमित एन्टरप्रायजेसची तर नारायण पेठेतील वाहनतळासाठीची कविता रामचंद्र मोरे यांची ६ लाख ४ हजार रुपयांची निविदा मंजुर करण्यात आली.
शुक्रवार पेठेतील भाऊ महाराज बोळातील पार्किंगची हिमाचल वेअर हौसिंग प्रा. लि.ची १ लाख ८० हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली.
फर्ग्युसन रस्त्यावरील मिलेनियम प्लाझा येथील २५ लाख १५ हजार रुपयांची निविदा मंजुर करण्यात आली.
तर जंगली महाराज रस्त्यावरील पार्किंगसाठी पीबीपी ग्रुपने भरलेली २२ लाख ५२ हजार ८५५ रुपयांची निविदा मंजुर करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pune PMC News | PMC Standing Committee approval for tenders for 7 parking lots in the city The corporation will get an income of around two and a half crore rupees every year

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा